Crime News | विवाहितेवर भरदिवसा अत्याचार नराधमास अटक

184
rape-victim-girl-fear-cries-rapist-shut

अहमदनगर : एका विवाहित तरूणी आपल्या लहान मुलास झोपी लावून घरात बसलेली असताना एका ५० वर्षीय नराधमाने घरात घुसून आतून दरवाजा लावून घेत या विवाहीत तरूणीवर बळजबरीने धमकी देवून भरदुपारी अत्याचार केला.

तसेच हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली. या प्रकरणात आरोपीचा एक साथिदार व पत्नीचा देखील समावेश आहे. ही संतापजनक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एका विवाहित तरूणी आपल्या लहान मुलास झोपी लावून घरात बसलेली होती. यावेळी रावसाहेब धोंडिबा घेडगे या नराधमाने घरात घुसून आतून दरवाजा लावून घेत,

या विवाहीत तरूणीला धरले मात्र तिने प्रतिकार केला असता त्याने धमकी देवून बळजबरीने तिच्या इच्छेविरूध्द अत्याचार केला. तसेच ही बाब जर कोणाला सांगितली तर तुझ्या आईवडिलांना मारून टाकील अशी धमकी दिली.
यानंतर घेडगे याचा साथिदार रवी भास्कर दिवटे व आरोपी घेडगे याची पत्नी शोभा रावसाहेब घेडगे यांनी पीडित तरूणीला झालेला प्रकार कोणाला सांगु नको व आमची बदनामी करू नको अशी धमकी दिली.

मात्र याबाबत पीडित विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, मुख्य आरोपी रावसाहेब धोंडिबा घेडगे याला ताब्यात घेतले आहे तर इतर दोघेजन पसार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

या बाबतची माहिती मिळताच मिळताच डिवायएसपी जाधव, पोलिस निरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळास भेट दिली असून तपासाबाबत सुचना केल्या आहेत.भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here