Crime News | सुनेच्या अनैतिक संबंधात सासूचा झाला अडसर ..

243

पती पत्नीचे नाते विश्वासावर टिकून राहते. जेव्हा पती पत्नीत दुरावा आणि तिच्या जीवनात दुसरा प्रवेश करतो तेव्हा गुन्हा तर हमखास घडतो. सोबत सर्व घरकुल उध्वस्त करत असतो. 

हे सर्व ठाऊक असले तरी ‘अनैतिक संबंध’ घडतात, पती कामानिमित्त घरा बाहेर राहत असल्याने सून ही सासूच्या सोबत राहत होती अशातच सुनेचे पाऊल वाकडे पडले आणि तिचे एका ठिकाणी विवाहबाह्य संबध सुरु झाले.

उपलब्ध माहितीनुसार, सलुबाई लाखे (५७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या गोराईच्या महात्मा फुले झोपडपट्टीत सुनेसोबत राहत हाेत्या. त्यांचा मुलगा कामानिमित्त बाहेरगावी असतो.

अनेकदा या विवाहितेला सासूने मित्रासोबत गैरकृत्य करताना पकडले. त्यामुळे तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या सुनेला प्रियकरासह अटक करण्यात आली. मुंबई शहरात बोरीवली पोलिसांनी ही कारवाई केली असून अवघ्या २४ तासात या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे .

सून राधा (२८) हिचे त्याच परिसरातील अण्णा माने ऊर्फ दीपक माने (३८) नामक व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. सलुबाई यांनी राधाला मानेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते.

त्यामुळे सून सासूवर खार खाऊन होती. त्यांच्या दोघींमध्ये या कारणावरून भांडण देखील झाले होते त्याचवेळी सुनेने सासूला ‘तुला बघून घेईल‘ अशी धमकी देखील दिली होती.

आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे बिंग सासू पतीला सांगेल याची भीती राधाला सतावत होती. त्यामुळे तिचा अडसर दूर केल्याशिवाय आपले नाते टिकणार नाही. हे लक्षात आल्यावर सासूचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतला.

२५ ऑक्टोबर रोजी घरासमोरील मोठा दगड राधाने घरात आणून ठेवला. त्यानंतर कामाच्या बहाण्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून निघून गेली.

त्यानंतर माने घरी गेला आणि त्याने सलुबाईंची दगडाने ठेचून हत्या केली. काम आटोपून परत आल्यावर तिने कोणीतरी हा प्रकार केल्याची आवई उठवली, मात्र पोलिसांनी काही तासाच्या आतच ह्या घटनेचा पर्दाफाश केला.

मुंबई शहरात बोरीवली पोलिसांनी ही कारवाई केली असून अवघ्या २४ तासात या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. बोरीवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविला.

परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाअंती मानेला अटक केली. त्याने राधाच्या सांगण्यावरून त्याने हा प्रकार केल्याचे कबूल केल्यानंतर दोघांनाही अटक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here