एकदा माणसाच्या नात्यात वासनेचा शिरकाव झाला कि, नात्याला किंमत उरत नाही. वासनांध नाती मग कोणताही गुन्हा करायला कचरत नाहीत. वासनेच्या खेळात नाती हरतात आणि गुन्हे जिंकत असतात.
अशीच एक घटना समोर आली आहे, जावई- सासूचे नाते आई इतकेच पवित्र मानले जाते, मात्र बिहारमध्ये जावई-सासू या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
बांका जिल्ह्यातील रजौन पोलीस स्टेशन परिसरातील लौढिया गावची आहे. या बातमीने परिसरात खळबळ माजली आहे. घरजावयाने हा प्रकार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मयत झालेल्या सासऱ्याचं नाव कलयुग पासवान असून त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह मुस्तफापुर येथील एका युवकाशी झाला होता.
हा युवक घरजावई म्हणून राहत होता. दरम्यान सासू आणि जावई यांच्या जवळीक आणि आकर्षण यातून अनैतिक संबंध जुळून आल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत.
सासू आणि जावयाच्या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या सासऱ्याचा अमानुषपणे खून करण्यात आला आहे. संशयित असलेला जावई हा सासऱ्याकडे घरजावई म्हणून राहत होता.
परंतु लग्नाच्या काही वर्षानंतरच जावई राजेश पासवान आपल्या सासऱ्याच्या घरी राहायला आला. जावयाने आपल्या सासूसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप राजेश (जावई) याच्यावर आहे.
घरातील सदस्यांना याबद्दल माहित होते. लॉकडाऊनच्या काळात सासरा कलयुगसुद्धा लुधियानाहून आपलं काम संपवून स्वतःच्या घरी राहायला आला होता.
सासरा कलयुग घरात राहत असल्याने ते सासू जावयाच्या अनैतिक संबंधात येऊ लागल्याने शेवटी त्यांचा निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप जावई राजेश पासवान याच्यावर आहे.
ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी सासू- जावयाच्या अनैतिक संबंधांमुळे सासऱ्याची हत्या झाल्याचं उघडपणे सांगितले असून पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत आहेत.
बांका एसडीपीओ दिनेश चंद्र श्रीवास्तव यांनी सासऱ्याच्या हत्येची पुष्टी केली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
रजौन येथे पोहोचून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितलं की अनैतिक संबंध आणि हत्येची अन्य कारणं लक्षात घेऊन चौकशी आणि तपास केला जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.