मामी व भाचाचे संबंध अतिशय हळवे आणि नाजूक असतात. त्यात थोडाही मोकळेपणा आला तर नात्याचे पावित्र्य भंग होते. मोकळेपणाचा अर्थ जर चुकीचा काढला तर गुन्हा घडायला वेळ लागत नाही.
अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे घडली आहे. मामीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणाने त्याच्या मामीची गळा चिरून हत्या केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली असून तो बीटेकचा विद्यार्थी आहे. केशव (नाव बदलले आहे) असे त्या तरुणाचे नाव असून त्याला त्याच्या मामीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते.
बुधवारी त्याची मामी घरात एकटी असताना त्याने मामीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. त्याचे ते बोलणे ऐकून मामीला राग आला व तिने त्याच्या कानाखाली मारली.
त्यामुळे राजेश संतापला व त्याने किचनमधील सुऱ्याने मामीचा गळा चिरला. त्यावेळी झालेल्या झटापटीत राजेशच्या हाताला देखील सुरा लागला होता.
मामीची हत्या करून राजेश तेथून पळून गेला. त्यानंतर पोलीस तपासाच्या वेळी देखील तो त्या ठिकाणीच थांबून पोलिसांना मदत करत असल्याचे नाटक करत होता.
मात्र पोलिसांनी हाताला जखम कशामुळे झाली याबाबत त्याला विचारले असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.
त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.