पुणे : नांदेड येथील एका पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक जवळीक साधून फसवणूक केल्या प्रकरणी बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक रहीम बशीर चौधरी (वय. ३०, रा. शिवनखेड खुर्द, अहमदपूर, लातूर)असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी एका महिला पोलिस शिपायाने फिर्याद दिली आहे.
त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यानंतर संबंधीत पोलिस उपनिरिक्षकाने बहिणीचे लग्नाचे कर्ज असून शेती गहाण ठेवली आहे.
ती सोडविण्यासाठी महिला शिपायाकडे पैशाची मागणी केली. तेव्हा फिर्यादीने कर्ज काढून रहीम चौधरी यांच्या वडिलांना ५ लाख रुपये दिले.
तसेच घराच्या बांधकामासाठी त्याने फिर्यादीकडून ९ ते १० तोळे सोने घेऊन गेला. ते परत केले नाही. त्याबाबत चौकशी केल्यावर चौधरी याच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांना अश्लिल शिवीगाळ करुन हात पाय बांधून उचलून नेण्याची धमकी दिली.
तेव्हा रहीम चौधरी याने आपली फसवणूक केल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.