मुंबई : डॉक्टरने नर्सवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार (Nurse rape) केल्याचा आरोप आहे. मुंबईत ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी डॉक्टरवर वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नर्सच्या आरोपांवरून वांद्रे पोलिसांनी डॉक्टरविरोधात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपी डॉक्टरवर अटकेची कारवाई केली नाही.
नेमके प्रकरण काय?
आरोपी डॉक्टर आणि तक्रारदार नर्स एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखतात. तक्रारदार नर्सच्या आरोपानुसार, आरोपी डॉक्टर आणि तिच्यात प्रेमसंबंध होते. पुढे हे दोघेही लग्न करणार होते.
लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केला, असा आरोप नर्सने केला आहे. दरम्यान, तक्रारदार नर्सने डॉक्टरकडे लग्नासाठी विचारणा केली. मात्र डॉक्टरने त्याला नकार दिल्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, याप्रकरणी नर्सने मुंबई पोलिसात धाव घेतली आहे. नर्सने संबंधित डॉक्टरवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार नर्सने दिली आहे. नर्सच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 376 अर्थात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
तुमच्यासाठी निवडक बातम्या !
- कोरोना रुग्णावर मृत्यूनंतरही 3 दिवस उपचार | नांदेडच्या रुग्णालयाचा पैसे उकळण्यासाठी संतापजनक प्रकार
- धक्कादायक ! प्रेयसीचा खून करून दुसरे लग्न करणाऱ्या आरोपीने दुसऱ्या पत्नीला दागिने देण्यासाठी सराफाची हत्या केली !
- बायकोला प्रियकरासोबत पतीने ‘आक्षेपार्ह’ अवस्थेत रंगेहाथ पकडले आणि भयंकर घडले!