Crime News | घरात घुसुन महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

169
Crime News | Police arrest accused into house and abusing woman

अहमदनगर :जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

यातच गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. मारहाण, छेडछाड, विनयभंग अशा घननामुळे महिला अस्तित्वाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

राहाता तालुक्यातील हसनापूर परिसरात राहणार्‍या एका 35 वर्षे वयाच्या तरुण महिलेला तिच्या घरी जाऊन घरात बळजबरीने घुसून अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार घडला.

याप्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याचेविरुध्द लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एक नोकरदार तरुण महिला हसनापूर शिवारात राहते.

तिच्या घरी जाऊन पोपट उर्फ पप्पू श्रावण शिंदे याने घरात घुसून तू नाईट ड्युटीला (रात्रपाळी) जाऊ नको, मी तुझी हजेरी लावतो, असे म्हणून परत येऊन तू फोनवर कुणाबरोबर बोलत होती,

असे म्हणत महिलेला बळजबरी करून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तू जर फोनवर कुणाला काही सांगितले तर तुझ्या आई वडिलांना ठार मारुन टाकील तसेच तुलाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी हे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here