पुणे : नाशिक महामार्गावर तालुक्यातील वर्दळीच्या ठिकाणी नारायणगाव येथील एसटी स्थानकासमोर विश्वनाथ लॉजवर छापा टाकत वेश्या व्यवसाय चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि परिसरात अनेक दिवसापासून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची कुणकुण पोलिसांना होती, त्यामुळे सापळा लाऊन पोलिसांनी यासोबत आळंदी येथील दोन तरुण महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
लॉज चालक अशोक हृदयनारायण तिवारी, गौरव अशोक तिवारी व कैलास नामदेव वाबळे याच्या मदतीने सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवत होते.
नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांना कळवली. सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक यांनी जाऊन वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली.
त्याप्रमाणे कैलास वाबळे याने वेश्या गमनासाठी महिला पुरवून त्याचेकडून विश्वनाथ लॉजचे चालक अशोक तिवारी, गौरव तिवारी यांनी एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली.
उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी व पोलीस स्टाफ व पंच यांनी सदर ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारी पीडित दोन महिला, लॉजचे चालक अशोक तिवारी, गौरव तिवारी यास ताब्यात घेतलं आहे.
सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मंदार जवळे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहून सदर छापा कारवाईसाठी पोलीस स्टाफ, पंच व बनावट गिऱ्हाईक यांना योग्य ते मार्गदर्शन करून छापा कारवाईसाठी रवाना केले.