crime News | शिवणकामासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

164
Rape crime news

शिवणकामासाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर पाठलाग दोघांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी या मुलीला शेतात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

त्यानंतर आरोपींनी या मुलीचे फोटो काढून घेत याबाबत वाच्यता केल्यास हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. जुन्नर तालुक्यात हा प्रकार घडला असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

पीडित मुलगी व तिच्या बहिणीची मुलगी 20 डिसेंबर रोजी शिवणकामासाठी गावातील दुकानात गेल्या होत्या. शिवणकाम संपल्यानंतर घरी परत येत असताना सौरभ वाळुंज व त्याचा मित्र करण यांनी त्यांचा पाठलाग केला.

त्यानंतर दोघांनी पीडित मुलीला जवळच्या शेतामध्ये ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला. तसेच पीडित मुलीचे फोटो काढून याबाबत कुणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर दोन्ही आरोपी त्यांचा मित्र आदित्य कबाडी त्याच्या गाडीवर बसून पळून गेले. सौरभ भगवान वाळुंज आणि आदित्य गुलाब कबाडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर तिसरा आरोपी करण शिवाजी वाळुंज हा फरार झाला आहे.

पीडित मुलीने आज जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपींविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान काही दिवसांनी पीडित मुलीच्या आईला हा संपूर्ण प्रकार समजल्यानंतर तिने मुलीकडे विचारपूस केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. आरोपींनी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

त्यामुळे याबाबत सांगितले नसल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन दोन आरोपींना अटक केली आणि फरार असलेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here