जळगाव : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या सख्ख्या भावाच्या विधवा पत्नीवर नराधम दीराने बलात्कार केल्याची घटना आज (दि. ५) सकाळी उघकीस आली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान दीराला अवघ्या काही तासांतच अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, सुप्रिम कॉलनीतील शिवाजी चौकात ३५ वर्षीय महिला आपल्या सासू आणि दोन मुलांसह भाड्याच्या खोलीत राहतात. ते मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
एक वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले होते. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १२.३० वाजता घरातील सगळे झोपले होते. रात्री एकच्या सुमारास महिला बाथरूमला उठली असता संशयित आरोपी दीर जागा होता.
त्या महिलेस तू मला आवडतेस असे बोलून हात पकडत बाथरूममध्ये ओढून बलात्कार केला. याचबरोबर कोणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी ही दिली.
सकाळी हा प्रकार पीडितेने आपल्या बहिणीला सांगितला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, इम्रान सय्यद, विजय बावस्कर, रवींद्र चौधरी, सचिन पाटील यांनी संशयीत आरोपी शहरातील फुले मार्केटमधून अटक केली आहे.