Crime News : ‘सेक्‍स रॅकेट’ मध्ये दुकानदार अडकला | लाखो रुपये घालवून बसला

191

पथ्रोट (जि. अमरावती) : जिल्ह्यातील केंद्रीय महामार्गालगतच्या ठिकाणी सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटच्या साखळीत एक दुकानदार अडकला आणि लाखो रुपये घालवुन बसला.

दुकानदाराला चोरून बनवलेली ‘ब्ल्यू फिल्म’ दाखवून ती वायरल करण्याची धमकी दिली. दहा लाखांची खंडणी मागण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

यासाठी एका व्यक्तीने मध्यस्थी केल्याने या सेक्‍स रॅकेटशी त्याचा संबंधसुद्धा जोडण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात युवकाने पाच लाख ७० हजार रुपये दिल्यावरही उर्वरित रकमेसाठी या रॅकेटकडून तगादा सुरू असल्याने सदरचे प्रकरण गावपरिसरात ठिकठिकाणी चर्चिले जात आहे.

पथ्रोटच्या जवळ असणाऱ्या एका गावातील तरुण हा येथील दुकानावर वारंवार येत असताना त्याची दुकानदाराने विचारपूस केली. त्यावेळी त्याने सेक्‍स वर्करबाबत दुकानदाराला माहिती दिली.

त्यावर तिला भेटण्याची इच्छा त्या दुकानदाराकडून व्यक्त होताच त्या तरुणाने सदर दुकानदाराला घेऊन अमरावती गाठले. केंद्रीय महामार्गालगतच्या एका लहान गावामध्ये असलेल्या एका खोलीवर नेले.

त्या बंद खोलीमध्ये तरुणी व या दुकानदारामध्ये जे झाले त्याची एक चित्रफीत तयार करण्यात आली, त्यानंतर ती त्याला दाखवून दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यास ती ‘ब्ल्यू फिल्म’ वायरल करून पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची धमकीसुद्धा त्याला देण्यात आली.

या प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या दुकानदाराने बदनामीला घाबरून पाच लाख ७० हजार रुपये त्यांच्या हवाली करून सोन्याची साखळी व अंगठीसुद्धा दिली. परंतु, एवढ्यावरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी उर्वरित चार लाख ३० हजार रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी त्या दुकानदाराकडे एकसारखा तगादा लावला.

एवढ्यावरच न थांबता ते वारंवार त्या तरुणीच्या माध्यमातून पोलिस ठाण्याला तक्रार देण्याची तसेच ती ब्ल्यू फिल्म वायरल करण्याची एकसारखी धमकी त्याला देत आहेत. घडलेल्या प्रकारामुळे सदरचा व्यक्ती प्रचंड दहशतीखाली वावरत असल्याची चर्चा गावात आहे.

या प्रकरणाची सर्वत्र चर्चा असली तरी पोलिसात मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे प्रकरण पानटपरीपासून तर गावातील चावडीवर चवीने चर्चिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here