शिरुर ताजबंद येथे घरासमोर खेळणाऱ्या शिवशंकर उमाकांत चुडमुडे या १४ वर्षाच्या मुलाचे अज्ञात व्यक्तींने अपहरण केले.
दि.६ डिसेंबरला दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मुलाची आई विद्यावती उमाकांत चुडमुडे यांनी ७ डिसेंबरला अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विद्यावती चुडमुडे या आपल्या शिवशंकर व शिवदास मुलांच्या शिक्षणाकरिता येथील समतानगरात राहतात. ६ डिसेंबरला शिवशंकर घरासमोर खेळत होता.
रात्र झाली तरी घराकडे आला नसल्याने मुलाची आई विद्यावती यांनी मुलाच्या आजोळी राजा दापका (ता. मुखेड, मूळ गाव कोडली ता. देगलूर) तसेच पुणे येथे वडिलांकडे फोनवरून चौकशी केली.
मात्र मुलगा तिकडे आले नसल्याचे सर्वांनी सांगितले. त्यामुळे कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली.