Crime News | चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

411
Murder Crime News

पुणे : पती पत्नीच्या नात्यात महत्वाचा विश्वास असतो. जेव्हा दोघांच्या नात्यात तिसऱ्याची एन्ट्री होते, तेव्हा त्या विवावबाह्य संबंधात एकाचा घात नक्कीच होतो.

पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घडली आहे. पती अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

सिव्हील इंजिनिअर असलेल्या पतीला झोपेच्या गोळ्या देऊन नंतर त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उरूळी कांचन येथे घडला आहे.

लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे हा प्रकार उघडकीस आला.

पत्नीसह तिच्‍या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अश्विनी मनोहर हांडे (१९, रा. उरूळी देवाची) आणि गौरव मंगेश सुतार (रा. उत्तमनगर, फुरसुंगी) अशी संशयित आराेपींची नावे आहेत.  मनोहर हांडे (२७, रा. उरूळी देवाची) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे.

विशेष म्हणजे या दोघांचा फक्त चार महिन्‍यांपूर्वी झाला हाेता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीचे आणि गौरवचे सातवीपासूनचे प्रेमसंबंध होते. बारावीपर्यंत दोघे एकत्र शिकत होते.

याच दरम्यान तिच्या घरच्यांनी तिचा विवाह मामाचा मुलगा असलेल्या मनोहर हांडे याच्याशी जानेवारी २०२१ मध्ये करून दिला होता. मनोहर सिव्हील इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. विवाहानंतरही अश्विनीचे गौरवबराेबर प्रेमसंबध संबंध सुरूच राहिले.

प्रियकराने आणून दिल्‍या झाेपेच्‍या गाेळ्या

मनोहर गुन्हा घडण्यापूर्वीच्या १५ दिवसांपासून कोरोना पॉझीटिव्ह असल्याने घरीच उपचार घेत होता. या काळात गौरवबरोबर असलेल्या संबंधाच्या कारणावरूनच पती-पत्नीमध्ये जोरदार भांडणे झाली.

याच रागातून मनोहरचा कायमचा काटा काढण्यासाठी गौरवने अश्विनीला झोपेच्या गोळ्या नेऊन दिल्या. तिने त्या झोपेच्या गोळ्या सुरुवातील चहातून मनोहरला गोळ्या दिल्‍या.

मात्र त्याच्यावर गोळ्यांचा परिणाम झाला नाही, म्हणून २३ मे रोजी गौरवने अश्विनीला पुन्हा झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. त्या गोळ्या तिने मनोहरला दुधातून दिल्या, या गोळ्या मात्र मनोहरला परीणामकारक ठरल्या होत्या.

काेराेनामुळे मृत्‍यू झाल्‍याचा बनाव

मनोहर झोपी गेल्यानंतर मध्यरात्री गौरव त्यांच्या घरी आला. अश्विनी व त्‍याने मिळून मनोहरचा तोंड व गळा दाबून खून केला. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौरव निघून गेला.

सकाळी वरील मजल्यावर राहणारी मनोहरची आई आली. यावेळी अश्विनीने मनोहरचा कारोनामुळे मृत्यू झाले असल्याचे सांगितले. कोरोनाचा फायदा घेत दोघांनी बनाव रचत, मनोहरचा मृत्यू हा कोरोनानेच झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.

पाेलिसांकडूनही  सुरूवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. गौरव आणि अश्विनी या दोघांनी मनाेहरचा खून करून झोपेच्या गोळ्याचे पाकीट व इतर पुरावे नष्ट केले.

असा आला गुन्हा उघडकीस

पोलिसांचा तपास कोरोनामुळे निधन झाले या भोवती फिरत होता. परंतु याच दरम्यान सपोनि राजू महानोर आणि पोलिस शिपाई दिगंबर साळुंखे यांना मनोहरच्या मृत्यूबाबत साशंकता निर्माण झाली.

त्यामुळे शुक्रवारी (दि.४) त्यांनी तपास सुरू करत मनोहरच्या शेजारी चौकशी केली. तेथे त्यांना मनोहर कामावर गेल्यानंतर त्यांच्या घरी एक मुलगा येत असल्याचे समजले.

सविस्तर माहिती घेतली असता तो गौरव असल्याचे त्यांना समजले.

गुन्‍ह्याची कबुली

मोबाईलच्या कॉल रेकॉर्डवरून अश्विनी आणि गौरव एकमेकांच्या सातत्याने सपर्कात असल्याची माहिती समाोर आली. दोघेही शाळेत आणि कॉलेमध्ये एकत्र शिकत असल्याचे व तेव्हापासूनच त्यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली.

सपाेनि महानोर यांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधान करता आले नाही. अखेर पोलिसांच्या तपासापुढे दोघे टिकू शकले नाहीत. तिने शेवटी आपला प्रियकर असलेल्या गौरवच्या मदतीने मनोहरचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर गौरवनेही खुनाची कबुली दिली.

पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, अमंलदार नितीन गायकवाड, शंकर नेवसे, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here