पत्नीने नांदायला येण्यास नकार दिला. त्यावरून पतीने पत्नीच्या नाकावर बुक्का मारून तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. ही घटना वाकड पोलीस ठाण्यासमोर घडली. पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांची बहीण आणि बहिणीचा आरोपी पती हे तिघेजण वाकड पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर उभे होते. त्यावेळी आरोपी क्षितिज याने पत्नीला नांदायला चल म्हटले.
पत्नी आणि फिर्यादी यांची बहीण स्नेहा हिने सासरी नांदण्यास जायला नकार दिला. त्यावरून क्षितिज याने स्नेहा यांच्या नाकावर ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.