Crime News | प्रेमसंबंधाचा बोभाटा होऊ नये म्हणून महिलेने पोटच्या मुलीची हत्या केली !

411
CRIME news

उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या प्रेमसंबंधात व्यत्यय येऊ नये म्हणून एका महिलेने तिच्या पाच वर्षाच्या मुलीची हत्या करून तिला विहिरीत फेकले.

डालमाऊ कोतवाली परिसरातील बलभद्रपूर येथील संतोष कुमार यांची पत्नी आपल्या पाच वर्षाच्या मुलीसह माहेरी होळीला माहेरी गेली होती.

31 मार्च रोजी ती सासरवाडीत परत गेली. पण मुलगी न आणता ती एकटी परत आली. त्यानंतर सासरच्यांनी तिला मुलीबद्दल विचारले आणि तिचा शोध घेऊ सुरु केला.

मात्र, ती मुलगी सापडली नाही, तेव्हा सासरच्या लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांना तिचा मृतदेह बलभद्रपूर गावापासून काही अंतरावर विहिरीत सापडला.

पोलिसांनी मुलीच्या आईकडे या घटनेबद्दल विचारपूस केली असता ती म्हणाली की, गेल्या एक वर्षापासून तिचे माहेरकडील एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. ती माहेरी गेल्यानंतर त्याच्याबरोबर राहत होती.

तिच्या धाकट्या मुलीने हे पाहिले आणि घरी गेल्यावर वडिलांना सर्व प्रकार सांगेन असे म्हणू लागली. तेव्हा आपले प्रेम संबंध कोणालाही कळू नयेत यासाठी प्रियकर आणि आरोपी महिलेने मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह एका विहिरीत फेकला.

या घटनेनंतर रायबरेलीचे पोलिस अधीक्षक श्लोककुमार यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहिरीतून काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरालाही अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here