औरंगाबाद : औरंगाबादेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकरानं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. पैठणमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. कृष्णा खुटेकर असं आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे. त्याने आपल्या राहत्या घरी केबल वायरच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.
चिठ्ठी लिहून कृष्णा खुटेकर याने आत्महत्या केली आहे. पोलिस तपासात मृतदेहाच्या खिशात ही चिठ्ठी सापडली आहे. ती मला खूप त्रास देत आहे. मला काही काही धमक्या देत आहे. मी खून मानसिक तणावातून जात हे पाऊल उचलत आहे. तरी, माझी काही चूक नाही, असं लिहिलं आहे.
दरम्यान, संबंधित मुलगी मानसिक त्रास देत आर्थिक लुबाडणूक करत असल्याचाही आरोप संबंधित तरुणीवर करण्यात आला आहे.