ट्विटर आणि काही पत्रकारांवर गुन्हे दाखल | युपीत वयोवृद्ध मुस्लिम व्यक्तीला ‘जय श्रीराम’ म्हणायला भाग पाडले गेले? काय आहे प्रकरण?

165
Muslim man

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी ट्विटर आणि काही पत्रकारांवर सामाजिक शांततेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

5 जून रोजी झालेल्या मुस्लिम वृद्ध व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गाझियाबाद पोलिसांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अब्दुल समद नावाच्या एका वयोवृद्ध व्यक्तीने व्हिडिओमध्ये दावा केला आहे की त्याची दाढी कापली गेली आहे आणि त्याला ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय श्रीराम’ म्हणायला भाग पाडले गेले होते.

अब्दुल समद यांनी आपल्याला जंगलात नेऊन बांधून ठेवले असल्याचा आरोप केला होता. पण घटनेला धार्मिक संदर्भ नव्हता, असे गाझियाबाद पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोपींची नावे पत्रकार राणा अयुबू, सबा नकवी आणि मोहम्मद जुबैर असे आहेत.

‘द वायर’ या ऑनलाईन न्यूज वेबसाईटने कॉंग्रेस नेते सलमान निजामी, समा मोहम्मद आणि मुस्कुर उस्मानी यांच्यावरही गुन्हा नोंदला गेला आहे.

या सर्वांवर आरोप केला गेला आहे की त्यांनी सत्यता न तपासता घटनेला धार्मिक रंग दिला. पोलिसांचे म्हणणे आहे की ही ट्वीटमागे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू होता. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की; हे ट्विट हजारो वेळा पुन्हा ट्विट केले गेले होते.

गाझियाबाद पोलिसांनी दाखल केलेल तक्रार

फोटो : UP POLICE

पोलिसांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिल्यानंतरही ट्विट हटविण्यात आले नाहीत आणि ट्विटरनेही या संदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

केंद्र सरकारने नवीन नियम लागू केल्यापासून ट्विटर विरोधात गाझियाबाद पोलिसांनीही पहिलीच तक्रार दाखल केली आहे.

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरला केंद्र सरकारने नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी 5 जूनलाचं सांगितले होते.

आठवड्याभरात नियमांची अंमलबजावणी करायची होती, परंतु ही मुदत संपुष्टात आली आहे. द हिंदूच्या मते ट्विटरची ‘मध्यस्थ’ (intermediary) स्थिती संपुष्टात आणली जाऊ शकते.

या नवीन नियमांमुळे आता ट्विटरवर कोणत्याही प्रकारच्या मजकूरासाठी जबाबदार असेल. यापुढे कोणतीही चुकीची माहिती प्रसारित केल्यास, त्याची जबाबदारी झटकून टाकता येणार नाही.

संबंधित बातम्या :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here