मुंबई : संपूर्ण देशाला सध्या वाढत्या कोरोना संकटाचा सामना करावा लागला आहे. देशातील एकूण कोरोना बळींची संख्या एक कोटीचा टप्पा ओलांडली आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. हे कोरोनाचे संकट असताना आता राज्यात आणखी एक संकट उभे राहिले आहे.
मुंबईसह राज्यात ५ ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याचे समजते. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे.
राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्त पुरवठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर याची माहिती देण्यात आली आहे. “मुंबईसह राज्यात पुढच्या ५ ते ६ दिवस आणि जास्तीत जास्त १० दिवस पुरेल इतका रक्तपुरवठा आहे. म्हणूनच गंभीर शस्त्रक्रिया करताना रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू शकतो. यासाठी नागरिकांनी रक्तदान करावे. रुग्णालये आणि विविध सामाजिक संस्था रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिंगणे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला दिलेला आदेश, भारतीय जनता पक्षाचा लॉकडाऊनला विरोध यावर राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
राज्यात तुर्तास लॉक लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होऊ शकते अशी चर्चा सुरु आहे. मात्र, राजेश टोपे यांनी ही चर्चा नाकारली आहे. लॉकडाऊनबाबत सध्या चर्चा सुरू आहे, यासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र सरकार याबाबत गंभीर विचार करीत आहे. त्यामुळे लॉकडाऊनसाठी सरकार तयार असणे आवश्यक आहे. राजेश टोपे यांनी राज्यात 50 टक्के लॉकडाउन लादल्याची बातमी नाकारली.
परंतु सद्य परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे आवश्यक आहे. येत्या एक-दोन दिवसांत बंदी जाहीर केली जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले. आम्ही शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाउन ठेवले आहे. आपला जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करावेच लागेल, असा इशाराही राजेश टोपे यांनी दिला आहे.