महाराष्ट्रापुढे पुन्हा लॉकडाऊनचे संकट | दुसरी लाटही भयावह ‘लॉकडाऊन ते लॉकडाऊन’

802

संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीत घेऊन मृत्यूचे थैमान घालणाऱ्या कोरोनाचा देशभरात शिरकाव झाला.

त्याला रोखण्यासाठी पहिल्यांदा 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू झाला. त्यानंतर एक दिवस सोडून 24 मार्चपासून पहिल्यांदा 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले.

देशात लॉकडाऊननंतर पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका, शिक्षक, आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे कोरोनाच्या शिरकाव झाला तरी इतर देशांच्या मानाने भारतात फार आणीबाणीची अवस्था निर्माण झाली नाही.

कोरोना देशात आल्यावर दिवसागणिक बाधित अन् मृत्यूंची संख्या वाढत गेली. शहरासह ग्रामीण भागात भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आठ महिने सुरू असलेली ही स्थिती आटोक्यात येण्यास सुरूवात झाली.

व्यापारी पेठांपासून ते भाजी मंडईपर्यंत काही बंधने घालण्यात आली. शैक्षणिकसंकुले वगळता सर्व काही सुरळीत झाले.

मात्र आता पुन्हा दुसर्‍या लाटेत लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी शंका येत आहे. बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने ‘भय इथले संपत नाही’, असे म्हणण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे.

दुसरी लाटही भयावह

कोरोना रोखण्यासाठी शासनाने सलग लॉकडाऊन केल्याचा थेट परिणाम तळागाळातील कामगार आणि असंघटित क्षेत्रातील मध्यमवर्गीयांवर सर्वाधिक दिसून आला. कोरोनामुळे जीवाभावाची माणसे तर सोडून गेलीच, पण रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांची वाताहात झाल्याचेही दिसून आले.

लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीनिमित्त कटू आठवणींना विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या महाराष्ट्राला खर्‍याअर्थाने सलामच केला पाहिजे.

पुन्हा नव्या जिद्दीने व नव्या उमेदीने कामास लागलेल्या महाराष्ट्राला आता कोरोनाची दुसरी लाट सतावत आहे. कोरानाच्या दुसर्‍या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन होऊ नये आणि संसाराचा गाडा पुन्हा विस्कळीत होऊ नये, अशीच प्रार्थना लोक करीत आहेत.

सन 2020 मधील लॉकडाऊन

 • 22 मार्च 2020 – जनता कर्फ्यू एक दिवस
 • 25 मार्च ते 1 एप्रिल – 21 दिवसांचे लॉकडाऊन
 • 15 एप्रिल ते 3 मे – 19 दिवसांचे लॉकडाऊन
 • 4 मे ते 17 मे – 14 दिवसांचे लॉकडाऊन
 • 18 मे 31 मे – 14 दिवसांचे लॉकडाऊन अनलॉक
 • 1 जून ते 30 जून – 30 दिवसांचे अनलॉक
 • 1 जुलै ते 31 जुलै – 31 दिवसांचे अनलॉक
 • 1 ते 31 ऑगस्ट – 31 दिवसांचे अनलॉक
 • 1 ते 30 सप्टेंबर – 30 दिवसांचे अनलॉक
 • 1 ते 31 ऑक्टोबर – 31 दिवसांचे अनलॉक
 • 1 ते 30 नोव्हेंबर – 30 दिवसांचे अनलॉक
 • 1 ते 31 डिसेंबर – 31 दिवसांचे अनलॉक
 • 1 ते 31 मार्च 2021 – 31 दिवसांचे अनलॉक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here