भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हा गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून होता. त्याने कोरोना काळात गरजू व्यक्तींना अन्नवाटप केल्याचे दिसून आले होते.
त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे कौतुकही केले गेले होते. परंतु त्याच्यावर आता एका वयोवृद्ध दांपत्याने गंभीर आरोप केल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे इरफान पठाणच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.
अहमदाबादच्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने इरफान पठाणचा आपल्या सूनेसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याने असेही आरोप केले आहेत की, आपली ओळख जास्त असल्याने त्याने त्या वृद्धाला आणि त्यांच्या मुलाला धमकावले देखील आहे.
यानंतर त्या वयोवृद्ध व्यक्तीने एक व्हिडिओ काढून शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, “जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर, आम्ही आत्महत्या करू.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
त्यामुळे पोलिसांनी या घटनेची दखल घेत सैयद इब्राहिम आणि त्यांच्या पत्नीवर आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलाने केला धक्कादायक खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम (तो वयोवृद्ध व्यक्ती) यांची सून इरफान पठाणची चुलत बहीण आहे. तसेच इब्राहिम यांचा मुलगा सय्यदने म्हटले की, “माझी पत्नी आणि इरफान पठाण यांचे दीर्घ काळापासून संबंध आहेत. तसेच लग्नानंतरही अवैध संबंध आहेत.
इरफान आणि माझी पत्नी नेहमी व्हिडिओ कॉलिंग करत असतात. ते लपून छपून अनेकदा फिरायला देखील गेले आहेत. ही गोष्ट कुटुंबियांच्या निदर्शनात येताच तिने आमच्यावर हुंड्यासाठी माझा छळ करतात असे आरोप केले होते.”
This old man is telling something about Cricketer Irfan Pathan, some serious allegations against him pic.twitter.com/3LtrYdf1ln
— Gopal Goswami (@gopugoswami) May 7, 2021
इस वीडियो को इतना वायरल कीजिये कि पुलिस मजबूर हो जाये क्रिकेटर इरफ़ान पठान के ऊपर कार्यवाही करने को pic.twitter.com/IHctYQsW4B
— Akash RSS (@Satynistha) May 5, 2021
इब्राहिमने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर जेव्हा इरफान पठाणला फोन कॉल करण्यात येत होते. तेव्हा त्याचा फोन बंद येत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्याच्या कुटुंबीयांनी अजुनपर्यंत या प्रकरणाबाबत कुठलेही स्पष्टीकरण दिले नाहीये. पोलिसांचेही म्हणणे आहे की, इरफान पठाण सोबत संपर्क होऊ शकलेला नाहीये.