देवेंद्र फडणवीस यांची टीका : राहुल गांधींची घोषणा बैलांनाही आवडत नाही’

199

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आडून कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. कॉंग्रेसच्या बैलगाडी आंदोलनावर टीका करताना त्यांनी राहुल गांधींनाही चिमटा काढला. 

त्यावेळी ते म्हणाले, “लोक राज्य सरकारवर इतके संतप्त आहेत की जर राज्यात मध्यावधी निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी सरकार भुईसपाट होईल.” असा दावाही त्यांनी केला. ते आज नागपुरात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलले. फडणवीस म्हणाले, “राज्य सरकार मध्यावधी निवडणुका घेण्याचाही विचार करणार नाही.

कारण त्यांना माहित आहे की, महाविकास आघाडी सरकारबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. म्हणून, जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडेल. लोकांना सरकार बद्दल प्रचंड राग आहे, यासाठी सरकार पळवाटा काढत आहे.

बैलांना राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा आवडत नाही !

दरम्यान, इंधन दरवाढीविरोधात मुंबईत कॉंग्रेस नेत्यांनी केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बैलगाडीपासून सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान, कॉंग्रेसचे कार्यकर्ते ‘राहुलजींसारखा देशाचा नेता असावा ‘ अशा घोषणा देत होते.

दरम्यान, भाई जगताप यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते बैलगाडीवर चढले होते. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एवढी बैलगाडीवर एवढी गर्दी केली की त्याचा बैलांनी भार उचलला नाही आणि ती बैलगाडी कोसळून मोडून पडली.

या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी ‘देश का नेता कैसा हो राहूलजी जैसा हो’ अशी घोषणाबाजी बैलानाही आवडत नाही असा चिमटा काढला.

इंधन दरवाढीच्या मुद्यावर आज कॉंग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे सर्व नेते बैलगाड्यांवर स्वार झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here