DAILY NEWS UPDATE | दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा

305
Today Top News

राज्य सरकारकडून राज्यात 1 मे पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

● कोरोना लस ठरतेय प्रभावी! लसीकरण झालेल्या 0.04 टक्के जणांना कोरोनाची बाधा, केंद्राचा अहवाल

● ‘कोविशिल्ड’ची एक लस राज्यांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 ला देणार; ‘सिरम’ने केल्या किमती जाहीर

● भारतीय वंशाच्या वनिता गुप्ता अमेरिकेच्या नव्या असोसिएट अॅटॉर्नी जनरल

● शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

● लग्नासाठी आता संख्येचीच नव्हे तर वेळेचीही मर्यादा, नियम मोडल्यास होणार 50 हजारांचा दंड

● महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांत केंद्राने ऑक्सिजन पुरवठा वाढवला- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

● चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, किंमत फक्त 9,499 रुपये Poco चा M2 Reloaded भारतात झाला लाँच

● दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीपुढे ढेपाळली कोलकात्ताची टीम; चेन्नईचा 18 धावांनी धमाकेदार विजय

● अभिनेता अजय देवगणचे डिजिटल विश्वात पदार्पण, ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’मधील लूक प्रदर्शित

Nanded News

● नांदेड जिल्ह्यात कोरोनाला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात 1322 रुग्णांचा मृत्यू

● कोरोना विषाणूमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत सन 2020 या वर्षात न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत आदिवासी कुटुंबाना विविध लाभ देण्यात आलेले आहेत

● कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात मयताच्या मुलाने केली तोडफोड

● 15 हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गणेशराव गुंडरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

Osmanabad News

● उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच! 667 रुग्णांची नोंद तर 711 रुग्णांना डिस्चार्ज

● जिल्ह्यात सर्वाधिक 328 रुग्ण हे उस्मानाबाद तालुक्यात सापडले आहेत, त्यापाटोपाट कळंब 83 , उमरगा 49 , तुळजापूर 66 व वाशी लोहारा 52 ने संख्या वाढली आहे

● जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथील ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यान्वित

● रुग्णांच्या नातेवाईकांनी उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी करु नये : जिल्हाधिकारी

● लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री. गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ येथे रामनवमी साजरी

● उस्मानाबाद शहरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्याची रॅपिड तपासणी केली जातेय

Latur News

● जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे उपलब्ध होणारा साठा जिल्हा प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली वितरित केला असून, ४९० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

● घरात घुसून उदगीर तालुक्यातील मोर्तळवाडी येथे एका महिलेवर जबरी अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि.२१) पहाटे दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाढवणा पोलिसात गुन्हा दाखल

● काडगाव तांडा (ता. लातूर) येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून हातभट्टी दारू काढणाऱ्या अड्डा उद्ध्वस्त केला. २ लाख ३५ हजार रूपयांचे रसायन व दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केले.

● कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे पाच दुकाने सील; मालकांकडून ५३ हजारांचा दंड वसूल

Aurangabad News

● जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली घाटी येथील ऑक्सिजन प्लांटची पाहणी

● जिल्ह्यात दिवसभरात 1207 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर 34 रुग्णांचा मृत्यू; जिल्हा प्रशासनाची माहिती

● पैठण पोलिसांनी अवैध देशी दारूचा साठा केला जप्त; दोन आरोपींना अटक

● खाजगी रुग्णालयाच्या प्रत्येक बिलाचे ऑडिट होणार; जिल्हाधिकारी यांचे आदेश

● जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी देवगिरी बँकेचे कोविड मदत केंद्र सुरू

● औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने रामनवमी साजरी

● मनपाची जम्बो लसीकरण मोहीम संकटात; मागणी 1 लाखाची मिळाल्या फक्त 15 हजार लसी

● पैठण प्रशासन उतरले रस्त्यावर; विनाकारण फिरणाऱ्यांवर केली दंडात्मक कारवाई

● वैजापूर तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करा; आमदार रमेश बोरणारे यांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here