लग्नानंतर मुलीच्या सासरी जाऊन करायचा ‘बलात्कार’ | नराधम सासऱ्याला जावयाने संपविले

505
rape

बापलेकीच्या विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार नागपूर इथे उघडकीस आला आहे. इथल्या एका पित्याने त्याच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला.

तिचे लग्न झाल्यानंतर हा विकृत बाप तिच्या सासरी जाऊनही तिच्यावर बलात्कार करीत होता. ही घटना जेव्हा मुलीने तिच्या नवऱ्याला सांगितली, तेव्हा त्याने सासऱ्याला संपवण्याचा निर्धार केला.

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. नराधम हा पिपळा गावात राहात होते. हा मूळचा लखनऊजवळच्या हसीमपूर गावचा रहिवासी होता.

नराधमम विकृत होता आणि स्वत:च्याच मुलीवर बलात्कार करत होता. मुलीचं लग्न होईपर्यंत त्याने तिच्यावर बलात्कार केला.

मुलीचं लग्न झाल्यानंतर तो मुलीच्या घरी जाऊ लागला आणि तिथेही तिच्यावर बलात्कार करायला लागला. जवळपास महिनाभरापूर्वी तो मुलीच्याच घरी राहायला गेला होता. या सगळ्याला कंटाळल्याने मुलीने अखेर तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला.

मुलीचा बाप तिच्यासोबत असं काही करत असेल अशी तिच्या सासरच्यांना कल्पनाही नव्हती. जेव्हा मुलीने तिच्या नवऱ्याला हा सगळा प्रकार सांगितला तेव्हा त्याने या बापाला घरातून हाकलून दिलं.

हाकलून दिल्यानंतरही हा विकृत मुलीच्या घरी सोमवारी गेला होता. त्यावेळेसही त्याने मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेच्या दिराने हे सगळं पाहिलं आणि महिलेच्या नवऱ्याला.

पिडीतेचा नवऱ्याने या विकृताला धडा शिकवायचाच असा निर्धार केला. सोमवारीच त्याने बायकोच्या बापाला गाठलं आणि धारदार शस्त्राने त्याचा खून केला.

पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तपास केला आणि काही तासांच्या आत आरोपींना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here