मुलाने कानाखाली लगावताच ‘आईचा’ जागीच मृत्यू | CCTV VIDEO व्हायरल

241

नवी दिल्ली : आईमुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

दिल्लीतील द्वारका परिसरात एका 45 वर्षीय मुलाने त्याच्या 76 वर्षीय आईच्या कानाखाली लगावली आणि त्यात जागीच त्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

द्वारका परिसरातील एका विवाहित मुलाने वृद्ध आईच्या कानाखाली मारल्याने त्या जागीच खाली कोसळल्या. या दुर्देवी घटनेमध्ये जागीच त्या माऊलीचा मृत्यू झाला आहे.

या महिलेचं नाव अवतार कौर असून त्या 76  वर्षांच्या होत्या. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

मीडिया अहवालानुसार, या घटनेमध्ये अवतार कौर यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना घडण्यापूर्वी अवतार कौर आणि त्यांच्या शेजारांमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता.

शेजाऱ्यांनी पोलिसांना देखील कळवले, पण पोलीस पोहोचल्यावर हा वाद मिटल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर मुलगा रणबीरने अवतार यांना झालेल्या वादासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी आईमुलामध्ये बाचाबाची झाली.

अवतार कौर आणि रणबीर यांच्यातील वाद इतका वाढला की त्याने आईच्या कानशिलात लगावली. या फटक्याने त्या खाली कोसळल्या.

घटनेवेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या अवतार यांच्या सुनेने आणि मुलाने त्यांना रुग्णालयात नेले पण रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या मुलाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नेटकरी करत आहेत.

बिंदापूर पोलिसांनी रणबीर याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here