दोन दिवसांत निर्णय : राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका, राज्यात पुन्हा कडक निर्बंध?

920
Latur lockdown

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका पाहून पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. राज्यात हळूहळू सावरणारे जनजीवन पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांत राज्यातील निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहेत. काही जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी पाहता राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाल्याचे समजते.

अत्यावशक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये. तसेच डेल्टा प्लस व्हेरियंट तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो, हा धोका ओळखून राज्य सरकार निर्बंध कडक करण्याच्या तयारीत आहे.

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय 20 दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. पण निर्बंध शिथिल केल्यापासून कोरोनाबाधितांच्या प्रमाणात वाढ होत आहे.

त्यातच डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू आढळल्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मंत्रिडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना रुग्णांचे साप्ताहिक प्रमाण आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आली होती.

दर आठवड्याला परिस्थितीनुसार निर्बंध कमी -जास्त प्रमाणात लागू करण्याचे धोरण सध्या राज्यात आहे. सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत.

गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रुग्ण संख्येत वाढ

गेल्या काही दिवसांपासून १० हजारांच्या खाली गेलेली कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसभरातील संख्येत बुधवारी काही प्रमाणात वाढ झाली.

त्यानुसार, दिवसभरात १०,०६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली.

केंद्राचा इशारा

कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिंटचे देशात 40 रुग्ण आढळले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात 21 रुग्ण आहेत.

महाराष्ट्रशिवाय केरळ आणि मध्य प्रदेशमध्येही नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आणि केरळला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here