Decisions taken by Sharad Pawar in government | शरद पवारांचे १३ महत्वपूर्ण ‘निर्णय’ माहित आहेत का?

237
Decisions taken by Sharad Pawar in government |

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस राज्यभर होत आहे.

शरद पवार मुख्यमंत्री तसेच केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे.

  • खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन करुन भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून दूर ठेवले आहे. साताऱ्यातील पावसातील सभेमुळे शरद पवार राज्यातील अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
  • लातूरच्या किल्लारी भूकंपावेळी शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली. पुन्हा संपूर्ण गाव वसवली. त्यामुळेच गुजरात भुंकपावेळी सरद पवार यांना केंद्राने आपत्कालीन मदत व्यवस्थेचे प्रमुख केले.
  • महिलांना सैन्यदलात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय संरक्षण मंत्री असताना शरद पवार यांनी घेतला. लष्करात महिलांना ११ टक्के आरक्षण दिले आहे.
  • १९८८ मध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना भटक्या विमुक्तांना घरे बांधण्यासाठी पुण्यात १४० एकर जमीन मंजूर केली.
  • अर्थसंकल्पात आदिवासींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्याचा निर्णय सरद पवारांनी घेतला हो निर्णय केंद्रानेही राबवला.
  • शेती कर्जावरील १२ टक्क्यांचा व्याजदर ४ टक्क्यांवर शरद पवार यांनी आणला.
  • शरद पवारांनी आणलेल्या एन्रान प्रकल्प राजकीय आकसापोटी विरोधकांनी बंद पाडला पण त्याची किंमत आजही महाराष्ट्र मोजतो.
  • अखिल भारतीय नाट्य परिषदेला अनेक अडचणीतून बाहेर काढले. तसेच यशवंत नाट्यगृह उभारले.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आणि राज्य महिला आयोग स्थापन करण्यात योगदान दिले.
  • शरद पवार यांनी कृषिमंत्री झाले तेव्हा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. ही कर्जमाफी इतिहासात सर्वात मोठी ठरली.
  • गहू आणि तांदळाच्या उत्पादनात भारताने जी यशस्वी झेप घेतली ती तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्याच कार्यकाळात.
  • क्रिकेटमध्ये आयपीएल सारखी लीग भारतात स्थापन केली. त्यामुळे जगात सर्वात जास्त पैसा कमावणारी बीसीसीआय ही संस्था ठरली.
  • झी मराठी या वाहिनीवर कुस्ती दंगल सुरु करुन पैलवैनांना प्रसिध्दी आमि पैसा मिळवून दिला.
  • महाराष्ट्रातील तीन वैधानिक विकास महामंडळाची स्थापना शरद पवार मुख्यमंत्री असतानाच केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here