उदगीर : नगर परिषद उदगीर तर्फे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत अल्पदरात त्या भागातील लोकांना फिल्टरचे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी आर ओ प्लांट बसवण्यात आले आहे.
यासोबत ऑटोमॅटिक व्हेडिंग मशीन ही बसवण्यात आलेली आहे, फक्त पाच रुपयांमध्ये वीस लिटर शुद्ध व स्वच्छ पाणी या भागातील लोकांना मिळणार आहे.
या योजनेचे उद्घाटन माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले.
याचे उदघाटन लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व नगर परिषदेचे अध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, काँग्रेस पक्षाचे नगर परिषदेतील गटनेते मंजूर खान पठाण, एमआयएमचे गटनेते शमशुभाई जरगर, सभापती मेहबूब भाई नगरसेवक अनिल मुदळे, राजकुमार भालेराव, मनोज पुदाले, दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, रामेश्वर पवार, फैजूखा पठाण, श्रीरंग कांबळे, आनंद बुंदे, पप्पू गायकवाड, साईनाथ चिमेगावे व विलास शिंदे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व त्या भागातील नागरिक उपस्थित होते.