दीप्ती व तिचा पती मनोज सोनी यांनी शिर्डीची बदनामी केली | दोघांची नार्को टेस्ट करा

206

अहमदनगर :  शिर्डी येथून इंदूरची महिला तीन वर्षापूर्वी बेपत्ता झाली होती ती इंदूर येथेच आता सापडली आहे, मात्र ही महिला शिर्डीतून बेपत्ता झाली होती, आणि तिच्या पतीने या महिलेचे अपहरण झाल्याची मोठी चर्चा केली होती.

शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्यासंदर्भात मिसिंग गुन्हा दाखल झाला असला तरी हे प्रकरण खंडपीठा पर्यंत गेले होते, त्यामुळे ते संपूर्ण राज्यात गाजले होते.

मात्र ही महिला इंदूरची व ती तीन वर्षांनी परत इंदूरमध्येच सापडली, ही महिला सध्या काही सांगत नाही, असे तिचा पती मनोज सोनी म्हणतो.

मात्र इंदूरची महिला इंदूरमध्ये सापडते ती शिर्डीतून बेपत्ता झाली, तीन वर्ष गायब होती आणि आता परत इंदूरला सापडते या पाठीमागे काहीतरी गौडबंगाल आहे.

मात्र त्यामुळे शिर्डीचे नाव बदनाम होत आहे, विनाकारण शिर्डी चे नाव त्यामध्ये बदनाम होत असून शिर्डीतून महिलांचे अपहरण होते याची चर्चा देश-विदेशात झाली त्यामुळे शिर्डीचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाला.

याला कारणीभूत मनोज सोनी व दीप्ती सोनी हेच आहेत, त्यामुळे या दोघांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदनी यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.

जितेश लोकचंदानी यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेल्या या मागणी पत्र पुढे म्हटले आहे की, इंदौर येथील सोनी परिवार शिर्डीला साई दर्शनासाठी आला होता.

दि.१० /८/२०१७ रोजी पती व लहान मुलगा व मुली समावेत शिर्डी शहरात साई दर्शन झाल्यानंतर प्रसादासाठी भोजनालयात हे कुटुंब गेले असता व नंतर बाहेर आल्यानंतर अचानक रहस्यमय दीप्ती मनोज सोनी ही महीला बेपत्ता झाली होती.

तसा मिसिगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, शिर्डी पोलिसांनी विविध प्रकाराने तपास करुनही मिळुन आली नाही , हे मिसीगचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे, असे असताना ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात तिच्या बहीणीला तीन वर्षानंतर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत बेपत्ता महिलेचा पती मनोज सोनी यांनी सांगितले की शिर्डी पोलिसांनी मेडिकल तपासणी केली असुन सोमवारी औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगुन १७ तारखेला ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात मोठ्या बहिणीला सापडली आहे ओळख वगैरे पटली आहे.

या बाबत ती इतकी वर्षे कोठे होती तीला कोणी आधार दिला ती इंदौर येथे कशी पोहचली या बाबत मी चौकशी चा प्रयत्न केला आहे.

मात्र ती फार काही सांगण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याने यांचा देखील शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास केला पाहिजे असे सांगितले.

शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी देखील शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता.

मनोज सोनी यांनी माहितीच्या अधिकारात किती लोक बेपत्ता झाली आहे, याची माहिती. प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

शिर्डी शहरात मानवी तस्करी होते ,याबाबत मोठा गाजावाजा झाला होता, मोठी चर्चा राज्य झाली होती त्यामुळे शिर्डी चे नाव मोठे बदनाम झाले होते त्यामुळे आर्थिक उलाढालीवर शिर्डीत फटका बसला होता ,

आता दिप्ती सोनी हि महीला जरी सापडली असली तरी या प्रकरणाची कठोर चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणण्यासाठी शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास करुन सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज आहे.

त्याचप्रमाणे दीप्ती मनोज सोनी व तिचा पती मनोज सोनी या दोघांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे, हे खरे बोलतात की खोटे बोलतात, हे संपूर्ण नागरिकांना साईभक्तांना कळणे गरजेचे आहे.

ही महिला बेपत्ता होते व इंदोर मध्ये स्वतःच्या शहरात सापडते, या पाठीमागे कोण आहे, याचाही शोध घेणे गरजेचे आहे. विनाकारण शिर्डीचे नाव महिलांचे अपहरण होते.

मनोज सोनी व दिप्ती सोनी यांच्यावरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी साई भक्तांच्यावतीने जितेश मनोहरलाल लोकचंदनी यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली असून या दोघांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here