दीप्ती काळे रुग्णालयातून पळून जाताना आठव्या मजल्यावरुन खाली पडली

375
Deepti Kale

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे, अशातच पूण्यातील ससून जिल्हा रुग्णालयातून पळ काढत असताना, एका महिलेचा मृत्यू झाल्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे.

खरेतर बहूतेक केसेसमध्ये रुग्णांचे पळून जाण्याचे कारण असते ती रुग्णालयातील परिस्थितीला आणि भितीचे वातावरण. परंतु पुण्यात जी घटना घडली ती थोडी वेगळी आहे.

ही महिला कोरोना पॉझिटिव्ह तर होतीच, परंतु ती एका खूना अंतर्गत आरोपीही होती. बुधवारी तिने रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती रुग्णालयाच्या 8 व्या मजल्यावरून खाली पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती काळे असे या मृत महिलेचे नाव आहे. ही महिला पेशाने वकील होती आणि खून प्रकरणात आरोपी देखील होती.

हॉस्पिटलमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. खाली पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी पुणे येथील बंद गार्डन पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीप्तीवर आपला साथीदार निलेश शेलार सोबत सराफा उद्योगपती बलवंत मराठे यांना आत्महत्येसाठी उकसवने आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल आहे.

महिला वसूली टोळीची प्रमुख

ही महिला एका वसूली टोळीची प्रमुख असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती, त्यामुळे तिला ससून रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये दाखल केले होते.

दीप्ती काळे सतत पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, म्हणून पोलिसही तिथेच तैनात होते. बुधवारी सकाळी ती बाथरूममध्ये गेली आणि खूप वेळ बाहेर आली नाही. खरेतर दीप्ती खिडकीतून बाहेर पडून पाईपद्वारे खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिचा पाय घसला आणि ती खाली पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here