दिल्लीच्या शेतकरी आंदोलन | टूलकिट प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत पोहचले ?

181
tool-kit-marathwada-conection

औरंगाबाद : दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात ‘टूलकिट’चा (Toolkit case) वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

या टूलकिट प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत असल्याचे पुढे आले आहे. टूलकिट तयार करणाऱ्या तिघांपैकी शंतनू मुळूक बीडचा असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील ‘टूलकिट’चे धागेदोरे थेट मराठवाड्यापर्यंत आले आहेत. टूलकिट ज्या तिघांनी तयार केले त्यातील एक संशयित शंतनू मुळूक हा बीड चा आहे.

त्याने अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आहे. त्यावर आज सूनवणीं होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी शांतनूच्या बीड आणि औरंगाबाद येथील त्याच्या घरची झाडाझडती घेतली अशी ही माहिती पुढे आली आहे.

दिल्ली पोलिसांनी तब्बल दोन दिवस औरंगाबाद आणि बीडमध्ये शंतनूबाबत चौकशी केली. बीड आणि औरंगाबाद येथील बँक खात्याची चौकशी पोलिसांनी केली. कुठून त्याच्या खात्यावर पैसे आले का किंवा कुणाला पाठवले का, याचीही चौकशी पोलीस करत आहेत.

कोण आहे शंतनू?

शंतनू याचे प्राथमिक शिक्षण बीड मध्ये झाले आहे. त्याने अमेरिकेतून machanical इंजिनीरिंग पदवी मिळवली आहे. त्याचे वडील शिवलाल हे बीडचे माजी नगराध्यक्ष आहेत.

शंतनू हा स्वतःला पर्यावरणवादी कार्यकर्ता समजतो. इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर त्याने औरंगाबादेत एका कंपनीमध्ये नोकरी केली. नंतर तो पुण्यात गेला. लॉकडाऊन लागल्यानंतर तो बीडमध्येच राहायला आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here