Delhi Riots | दिल्ली दंगलीतील हिंदू आरोपींविषयी मोठी ‘धक्कादायक’ माहिती

208

नवी दिल्ली: सीएए कायद्याच्या विरोधात देशभरात विरोध सुरू झाल्याने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत दंगल उसळली होती.

या दंगलीत अनेकजण मारले गेले होते. तर शेकडो जण जखमी झाले होते. दरम्यान, या दंगली प्रकरणी अटक करून तिहार तुरुंगात ठेवण्यात आलेल्या हिंदू आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दिल्ली दंगली प्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या हिंदू आरोपींना तुरुंगातच जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. या आरोपींना तुरुंगामध्येच पारा पाजून ठार मारण्याचे कारस्थान उघड झाले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार तिहार तुरुंगात बंद असलेला शाहिद आणि तुरुंगाबाहेर असलेल्या अस्लमने हे कारस्थान रचले होते. हे कटकारस्थान तडीस नेण्यासाठी अस्लमने तुरुंगात असलेल्या शाहीदकडे पारा पोहोचवला होता.

दिल्लीतील जातीय दंगलीदरम्यान मौजपूर पुलिया आणि शिवविहार पुलियया जवळ हत्या करणाऱ्या आरोपींची तुरुंगातच हत्या करण्याचा कट आखण्यात आला होता.

या कटकारस्थानाची कुणकूण लागताच स्पेशल सेलने टेक्निकल सर्व्हिलान्स ठेवण्यास सुरुवात केली आणि हा कट उधळून लावला.

दिल्ली पोलिसांनी तिहार तुरुंगातून कटासाठी आणण्यात आलेला पारा जप्त केला आहे. तसेच दोन्ही आरोपींनाही अटक केली आहे.

गेल्या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील उत्तर-पूर्व जिल्ह्यातील जाफराबाद परिसरामध्ये दुपारच्या वेळी अचानक दंगल भडकली होती.

या दंगलीचे लोळ संपूर्ण जिल्ह्यात पसरले होते. या दंगलीमध्ये अधिकृत आकडेवारीनुसार ५३ जणांचा मृत्यू झाला होता. आयबीचे अधिकारी अंकित आणि दिल्ली पोलिसांचे एक हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा या दंगलीत मृत्यू झाला होता.

या दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत एकूण ७५१ एफआयआर दाखल केल्या आहेत. दिल्लीतील कडकडडूमा कोर्टात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

या हिंसेतील मास्टरमाइंड असलेला आपचा माजी नगरसेवक ताहीर हुसेन आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक इशरत जहाँ तिहार तुरुंगात बंद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here