कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी | निलेश राणेंचं ट्विट चर्चेत

164

मुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांनतर राज्यातील राजकारण तापले आहे. मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. 

बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता विरोधकांकडून राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. 

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.  

भाजप नेते निलेश राणे यांनीही धनंजय मुंडेंबाबत भूमिका मांडली आहे.धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळं भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, माहिती लपवणं निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंयज मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,’ अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून खुलासा केला आहे. त्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन करु, असा इशाराच दिला आहे. त्यामुळं यासगळ्या प्रकरणावर अधिक राजकारण तापण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here