रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शनिवारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत एकमताने देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
आतापर्यंत प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे हे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. प्राध्यपक अनिरुद्ध देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख आहेत. देशपांडे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणून सलग दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत.
प्रबोधिनीच्या आम सभेत राज्यसभा खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
या सोबतच जेष्ठ भाजपा नेते भाई गिरकर हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. अरविंद रेगे यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था १९८२ पासून कार्यकर्ता निर्माणच्या क्षेत्रात कार्यरत आहे.