धनंजय मुंडे प्रकरणात द्विभार्या प्रतिबंधक कायदा त्यांना लागू होऊ शकत नाही | असीम सरोदे यांचे मत

232

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, ‘त्या’ महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते, असा खळबळजनक खुलासा धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केला. यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेला उधाण आले आहे.

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती.

सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे.

शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात.

माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, अशी कबुली मुंडे यांनी दिली आहे.

द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार, २ लग्न करणे हा गुन्हा आहे. याचाच अर्थ असा की कायदेशीर दोन पत्नी असू शकत नाहीत.

याबाबत कायदेशीर तरतुदींविषयी बोलताना ॲड. असीम सरोदे म्हणाले की, धार्मिक अथवा रजिस्ट्रर पद्धतीने लग्न केले आहे ती कायदेशीर पत्नी. पहिली कायदेशीर पत्नी आहे.

तर दुसऱ्या एका स्त्री सोबत प्रेमविवाह केला असल्यास त्याला कायद्यात मान्यता नाही. धनंजय मुंडेंची पहिली कायदेशीर पत्नी आहे. तर एका स्त्री सोबत ते सहजीवन जगत आहेत.

दुसऱ्या स्त्रीसोबत त्यांचे सहमतीने संबंध असले तरी ती त्यांची कायदेशीर पत्नी नाही. मात्र, ते विवाहसारख्या संबंधात आहेत. त्यांनी सहमतीच्या संबंधामधून जन्माला आलेल्या दोन मुलांना स्वीकारले आहे.

त्यांनी विवाहबाह्य संबंध स्वीकारल्याने अन्यायाच स्वरुपचं बदलतं. पण दुसऱ्या स्त्री सोबत विवाहबाह्य संबंधात असताना तिच्या बहिणीने केलेला ‘आरोप’ अत्यंत गंभीरपणे घेण्याची गरज आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निर्णयानुसार, स्त्री- पुरुषाचे संबंध कायदेशीर अथवा बेकायदेशीर असू शकतात. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध मान्य केले. त्यांनी असं जाहीर केल्याने अन्यायाचं स्वरुप बदलले आहे.

द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार, हिंदू पुरुष दोन पत्नी करु शकत नाही. या कायद्याच्या अनुषंगाने विचार केल्यास धनंजय मुंडे यांची एक कायदेशीर पत्नी आहे.

तर दुसऱ्या एका स्त्रीसोबत त्यांचे विवाहसारखे संबंध आहेत. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा त्यांना लागू होऊ शकत नाही, असे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here