धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणात रेणू शर्माचा ‘हनीट्रॅप व्हाया मनीट्रॅप’

171

मुंबई : धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणात नवनवीन मुद्दे समोर येत आहेत, एखाद्या डेलीसोप सीरिअल प्रमाणे नव नवीन धक्कादायक वळणं आणि खुलासे समोर येत आहेत. 

रेणू शर्मा या महिलेविरोधात भाजपा आणि मनसेच्या नेत्याने हॅनीट्रॅपसारखा प्रकार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरण आता नव्या वळणावर आले आहे.

सदरील महिलेवर जेट एअरवेजमध्ये काम करणाऱ्या रिझवान कुरेशी या व्यक्तीने वर्षभरापूर्वीच रेणू शर्माविरोधात तक्रार केली आहे.पैसे देणे बंद झाल्यानंतर ही महिला पोलिसांत तक्रार करते असा आरोप कुरेशी यांनी केला आहे.

रेणू शर्मा या महिलेने राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर या प्रकरणात टीव्ही मालिकांसारखे एकानंतर एक भाग दररोज पुढे येत आहेत.

एकंदरीत धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरण आता वेगळ्या दिशेने जात आहे, हे प्रकरण हनीट्रॅप व्हाया मनीट्रॅप असे समोर येऊ लागले आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर हे प्रकरण नेमकं काय आहे हे स्पष्ट होणार आहे.

शरद पवारांची विश्वास नांगरे पाटलांशी चर्चा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांची देखील बैठक घेतली असल्याचं बोललं जात आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृहाकडे निघाले होते, तेथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी विश्वास नांगरे पाटील चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपा नेते कृष्णा हेगडे यांचीही तक्रार

भाजपाचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा या महिलेविरोधात आपण तक्रार देणार असल्याचं सांगितल्यानंतर, मनसेचे नेते मनिष धुरी हे देखील तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत.

कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी म्हटलं आहे की, ही महिला मैत्री करण्यासाठी पुढे येते, आणि असं वाटतं की, ही महिला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करते.

धनंजय मुंडे यांच्यावर या रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. तिच्या आरोपानंतर ज्या पद्धतीने खुलासे होत आहेत ते एकदम धक्कादायक आहेत.

मनसेचे मनीष धुरीही तक्रार करणार

या प्रकरणी कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांच्यात आणि माझ्यात मैत्री नाही. मी त्यांना ते आणि मी आमदार असताना दोन तीन वेळेस भेटलो असेल.

एका महिलेने असं कुणासोबत गंभीर आरोप केलेले आहेत, असं होवू नये, यासाठी मी तक्रार करण्यास पुढे आलो असल्याचं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे. हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाही.

मला हे पाहायचं नाही की, कोणता पक्ष आहे, आणि कुणावर काय आरोप, जे काही सत्य आहे आणि यापुढे कुणाची फसवणूक व्हायला नको. यासाठी मी सर्वांसमोर येऊन हे सांगतोय, आणि पोलिसांमध्ये तक्रार देत आहे, असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारवाईच्या कामाला लागला

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली प्रतिमा जपण्यासाठी जोर बैठकावर दिला आहे.

खुद्द शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर आहे, असं म्हटल्यानंतर धनंजय मुंडे यांची मंत्रिपदाची विकेट जाणार असल्याचा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे. काय घडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here