धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये ‘मतमतांतरे’

219

राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी पक्षात मतमतांतरे आहेत.

धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे व लाडके ओबीसी नेते मानले जातात.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या समवेत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा धनंजय मुंडे यांची महत्वपूर्ण ‘भूमिका’ होती. त्यावरून पक्षात तणाव देखील निर्माण झाला होता.

धनंजय मुंडे यांना महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीत अजित पवार गटामुळे ‘सॉफ्ट कॉर्नर’ दिला जाऊ नये.

या प्रकरणात शरद पवारांनी स्वतः लक्ष घालावे, हा नाजूक विषय कौशल्याने हाताळला जावा अशी ज्येष्ठ नेत्यांची मानसिकता आहे.

बलात्काराचा आरोप व विवाहबाह्य संबंधाची स्वतःच दिलेली कबुली यामुळे पक्ष बदनाम होतोय असे एक गट म्हणत आहे.

यासाठी धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला होता.

त्याच दरम्यान भाजपचे मुंबई उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांच्या भूमिकेनंतर चित्र बदलले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.

तरीही मुंडे यांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यानी दिले आहेत.

गुरुवारी दुपारपर्यंत शांत असणारे राष्ट्रवादीचे नेते अचानक आपली मते बोलून दाखवू लागले आहेत.

त्याला कारण भाजपचे मुंबई उपाध्यक्ष माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्या विरोधात दिलेली तक्रार ठरली आहे.

मनसेचे नेते मनीष धुरी यांनी देखील आपल्याला सदर महिलेने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगितले.

त्यानंतर मुंडे यांच्या बाजूने अचानक वातावरण बदलू लागले.

कोणताही निर्णय घेण्याआधी संपूर्ण चौकशी होऊ द्या.

प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर निर्णय घ्या, असे आपण पक्ष नेत्यांना सांगितल्याचे काही आमदारांनी स्पष्ट केले.

या विषयावर कोणीही मोकळेपणाने नावासह बोलायला तयार नाही. मात्र सगळे कुजबुज करीत आहेत.

मात्र एक मंत्री म्हणाले, राजकारणात नाव मिळवण्यासाठी, मंत्री पदापर्यंत येण्यासाठी अनेक वर्षे घालवावी लागतात.

कोणीतरी ब्लॅकमेल करून बदनाम करणार असेल तर ही प्रथा सर्वच पक्षांसाठी अतिशय घातक ठरेल.

धनंजय मुंडे चुकले असतील तर जरूर शिक्षा करा. मात्र ब्लॅकमेल करणाऱ्यांवर विश्वास ठेवून एखाद्याची राजकीय कारकीर्द संपवू नका, अशा भावना अजित पवार गटाच्या आमदार राम मधून पुढे येत आहेत.

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांची जोरदार पाठराखण केल्याचे समजते.

शरद पवार यांना देखील अजित पवार आणि त्यांना मानणाऱ्या आमदारांना नाराज करायचे नाही.

त्यामुळे कोणालाही न दुखावता योग्य मार्ग काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे देखील आहे.

राजीनामा घेणार का?

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री नवाब मलिक यांना क्लीनचिट दिली.

मात्र मुंडे यांच्या विषयीच्या तक्रारी गंभीर आहेत, असे सांगितले.

याचाच अर्थ मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा जोरात सुरू झाली.

मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी असे तडकाफडकी काही होणार नाही.

पक्षाच्या बैठकीत विचारविनिमय आणि योग्य ती चर्चा होऊन निर्णय होईल असे सांगण्यात आले आहे.

फक्त तात्पुरती मलमपट्टी करून डॅमेज कंट्रोल केले जात असल्याचेही बोलले जात आहे.

त्यामुळे धनंजय मुंडे यांचे नेमके काय होणार, हा प्रश्‍न महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here