“दिलीप ‘साहब’ कुमार थकले, त्यांच्यासाठी प्रार्थना करा” | पत्नी सायरा बानो यांची भावनिक हाक

196

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय ‘जेष्ठ कपल’ म्हणजे, दिलीप कुमार आणि सायरा बानो. दिलीप कुमार यांच्यासोबत सायरा बानो नेहमी असतात.

सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या तब्येतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सोबतच एक भावनिक आवाहन केले आहे.

सायरा बानो यांनी सांगितलं आहे की, “दिलीप कुमार थकले आहेत. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी झाली आहे.” एवढंच नाहीतर सायरा बानो यांनी सर्वांना दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सायरा बानो म्हणाल्या की, त्या दिलीप कुमार यांची काळजी कोणत्याही दबावापोटी घेत नाहीत, तर त्यांचं दिलीप कुमार यांच्यावर प्रेम आहे.

त्यामुळे त्या त्यांची खूप काळजी घेतात. त्या पुढे बोलताना हेदेखील म्हणाल्या की, “लोकांनी माझं कौतुक करावं, यासाठी त्यांची काळजी घेत नाही. तर त्यांच्या सहवासात राहणं हे माझ्यासाठी सर्वात प्रिय गोष्ट आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि ते माझा श्वास आहेत.”

यावर्षी साजरा केला नाही लग्नाचा वाढदिवस

दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. परंतु, यंदाच्या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांचं निधन झाल्यामुळे त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला नाही.

दरम्यान, या खास दिवशी सायरा बानो यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की, “11 ऑक्टोबर माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर दिवस आहे.

दरम्यान, दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला 54 वर्ष पूर्ण झाली आहेत. दिलीप कुमार यांचं खरं नाव मुहम्मद यूसुफ खान आहे. त्यांनी 1944 मध्ये आलेला चित्रपट ‘ज्वार भट्टा’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदललं.

या दिवशी दिलीप कुमार साहब यांनी माझ्याशी लग्न करुन माझं स्वप्न पूर्ण केलं होतं. सर्वांना माहिती आहे की, आम्ही आमच्या कुटुंबातील दोन भाऊ एहसान आणि असलम यांना गमावलं आहे”.

त्या म्हणाल्या की, “कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. आम्ही आमचे मित्र, कुटुंबियातील व्यक्तींना विनंती करतो की, सर्वांनी एकमेकांची काळजी घ्या. देवा आपल्या सर्वांचं रक्षण करो.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here