घृणास्पद व संतापजनक | मोठ्या भावाचा विवाहित बहिणीवर बलात्कार

158
Rape crime news

दररोज माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांनी समाज कोणत्या कुठे जातोय हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी आईवर बलात्कार झाल्याची घटना आपण वाचली.

आता चक्क बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

वयाने लहान असलेल्या विवाहित बहिणीवर मोठ्या भावानं बलात्कार केला आहे.

माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये घडली आहे.

विकृतीचा कळस म्हणजे याचा व्हिडीओ तयार करून वाच्यता केल्यास व्हायरल करण्याची धमकीही दिली.

सतत छळ होत असल्यानं पीडितेने पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली आहे.

पीडित महिलेचा पती बाहेर असताना मोठा भाऊ तिच्या घरी आला.

त्यावेळी तो मद्याधुंद अवस्थेत होता. यावेळी त्याच्यासोबत मद्यपान केलेला मित्रही होता.

बहीण एकटी असल्याचं बघून भावाने तिच्या बलात्कार केला, तर त्याच्या मित्रानं व्हिडीओ शूट केला.

त्यानंतर झालेल्या प्रकाराची कुणाकडे वाच्यता केल्यास व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर भावाचं हीन कृत्य थांबलं नाही. त्यानंतर तो पीडितेवर लक्ष ठेवायचा तसेच छळही करू लागला.

दुसरीकडे पीडितेचे आईवडिलही तिच्या पोलिसात न जाण्यासाठी दबाव आणू लागले.

त्यामुळे पीडितेचा संयम सुटला आणि तिने पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

महिलेनं तक्रार दिल्यानंतर मोरादाबाद पोलिसांनी सोमवारी पीडितेचा भाऊ व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ही घटना घडल्यानंतर आपण पतीला सांगितलं. त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा कुटंबीयांनी सामाजातील प्रतिष्ठा खराब होईल, असं सांगत तक्रार न करण्यासाठी दबाव टाकला.

मात्र, आरोपी भाऊ घराच्या परिसरातच फिरायला लागला. तसेच छळ करू लागला आणि धमकी देऊ लागला.

त्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार केली, असं महिलेनं फिर्यादीत म्हटलं आहे.

मुख्य आरोपीसह त्यांच्या मित्राविरुद्ध बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सध्या फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असं सिव्हील लाईन पोलीस ठाण्याचे प्रमुख दर्वेश कुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here