महाविकास आघाडीत वाद? विधानसभाध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क : वडेट्टीवार

200

मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. 

दरम्यान, नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत नापसंती व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होत असताना राजीनामा देण्याची गरज नव्हती अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारसमोर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा समोर येणार आहे. सह्याद्रीवरील मंत्रीमंडळ बैठकीनंतर याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here