संतापजनक ! सापाच्या डोक्यात घातला वापरलेला कंडोम

295

समाजात मुक्या प्राण्यांना त्रास देण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या, पण एकापेक्षा एक हिडीस व किळसवाणा प्रकार पाहिला नसेल.

मुंबईत कांदिवली पूर्वेला शनिवारी एक साप आढळला. खरे कारण पाहून सर्वांना धक्का बसला.

कारण या सापाचा जगण्यासाठी संघर्ष सुरु होता.

अज्ञात व विकृत व्यक्तीने या सापाच्या डोक्यात वापरलेला कंडोम घातला होता.

चेहरा कंडोमने झाकला गेल्यामुळे त्या सापाची श्वासोश्वास करण्यासाठी धडपड सुरु होती.

त्या अवस्थेतून सापाची सुटका केल्यानंतर लगेच त्याला पशूवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले.

नेमकं काय घडलं ?

शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ग्रीन मीडोस हाऊसिंग सोसायटी जवळ हा साप आढळला.

श्वासोश्वास करण्यासाठी त्या सापाची धडपड सुरु होती.

एका स्थानिक रहिवाशाने मदतीसाठी मिता मालवणकर या महिला सर्पमित्राला घटनास्थळी बोलवले.

मिता लगेच त्या ठिकाणी पोहोचल्या. “स्थानिक रहिवाशी वैशाली तानहा यांचा मला फोन आला.

एक साप विचित्र पद्धतीने सरपटत असून त्याच्या डोक्याभोवती प्लास्टिक बॅग गुंडाळलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

मी तिथे पोहोचले, तेव्हा समोरचे दुश्य पाहून मला धक्का बसला.

कारण कोणीतरी घाणेरडा, वापरलेला कंडोम सापाच्या चेहऱ्याभोवती गुंडाळलेला होता” असे मिता मालवणकर यांनी सांगितले.

मिता यांनी पद्धतशीरपणे त्या अवस्थेतून सापाची सुटका केली.

सर्प पकडण्यामध्ये प्रशिक्षित असलेल्या व्यक्तीने किंवा तज्ज्ञाने हे क्रूर कृत्य केल्याचा संशय मिता त्यांनी व्यक्त केला.

कारण सापाच्या चेहऱ्याभोवती कंडोम गुंडाळणे इतके सोपे नाही.

त्यांचा दंश खूप वेदनादायी ठरु शकतो. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

सुटका केल्यानंतर ..

सापाची सुटका केल्यानंतर मिता त्या सापाला बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये घेऊन गेल्या.

डॉ. शैलेश पेठे या पशूवैद्यकीय अधिकाऱ्याने सापाची तपासणी केली.

उपचारानंतर त्या सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी पुन्हा सोडून देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here