राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त भरत चामले यांच्यावतीने मोफत बियाणे व खत वाटप

396

उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त (दि.१०) उदगीर तालुक्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या अल्पभूधारक कुटुंबियांना महाराष्ट्र राज्याचे कापूस पणन महासंघाचे डायरेक्टर तथा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांनी मोफत बियाणे व खत वाटप केले.

आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन 22 वर्षे झाली, पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे संचालक तथा स्व.रामचंद्रराव पाटील तळेगावकर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांनी स्तुत्य उपक्रम राबविला.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे व सेंद्रिय खत यांचे मोफत वाटप केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर तालुक्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे, खरेदी-विक्री संघाचे संचालक बाबासाहेब काळे पाटील, विकास सोसायटी चेअरमन किशनराव मोरे, तोंडचिर सोसायटी चेअरमन शिवाजी पाटील, पिंपरी सोसायटी चेअरमन शिवकुमार पांडे, लोहारा सोसायटी चेअरमन शेषेराव हेळगे, दावनगाव चेअरमन रमेश भंडे यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामेश्वर गोरे यांनी बोलताना म्हटले की, मी अनेक तालुक्यात काम केली पण तेथे खरेदी-विक्री संघाचे काम ऐकिवात आले नाही.

उदगीर तालुक्यात आल्यापासून येथील खरेदी-विक्री संघाचे शेतकऱ्यांविषयाचे मौलिक कार्य पाहून एक छोटी संस्था सुद्धा शेतकरी व लोक हिताची चांगले कामे करू शकते. हे पाहून आनंद होतोय, सोबतच संघाच्या चेअरमन विषयी मला सार्थ अभिमान वाटतोय.

उपस्थित पिंपरी सोसायटीचे चेअरमन पांडे यांनी बोलताना म्हटले की, भरतभाऊ चामले यांनी नेहमीच उपेक्षिताना न्याय दिला आहे, समाजातील प्रत्येक घटकाला मदत करत आहेत, याला उदगीर तालुक्यातील जनता साक्ष आहे.

यावेळी बाबुराव आंबेगावे, व्यंकटराव पेठे, शेकापूर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब नवाडे, नावंदी सोसायटीचे चेअरमन बालाजी परगे, युवराज कांडगिरे आदींसह तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब नवाडे यांनी केले तर आभार युवराज कांडगिरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here