फ्रिजमधले पदार्थ आणि कांद्यामुळे ब्लॅक फंगसचा प्रसार होतो का? डॉक्टरांनी सांगितले व्हायरल पोस्टमागचे सत्य!

772
Gardening Know How Onion Black Mold Control - Treating Onions With Black Mold

कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर आता ब्लॅक फंगसने भीती दाखवायला सुरुवात केली आहे.

भारतातील काही राज्यानी ब्लॅक फंगसला माहामारी घोषित केली आहे. कोणतीही माहामारी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात अफवा परसल्या जातात.

या संकटात देखील कांदा आणि रेफ्रिजिरेटरमुळे ब्लॅक फंगस पसरतो अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

या पोस्टमध्ये सांगितले जात आहे की, कांद्यावरचे काळे डाग हे ब्लॅक फंगसचे असून फ्रिजमधील रबरच्या भागावर दिसणारे काळे डागसुद्धा ब्लॅक फंगसचे असू शकतात. या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या पोस्टवर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार काही खाद्य पदार्थांवर दिसणारा काळपटपणा ब्लॅक फंगस नाही.

रेफ्रिजरेटरमधून फंगस पसरतो का?

या पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, रेफ्रिजरेटरमध्ये दिसत असलेल्या रबरमध्ये काळपटपणा दिसून येतो ते ब्लँक फंगस एक यीस्ट इन्फेक्शन आहे.

यावर दिल्लीतील स्वामी दयानंद रुग्णालयातील जनरल फिजिशनयिन डॉ. ग्लॅडविन त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रिममध्ये काळपटपणा दिसतो त्याचा ब्लॅक फंगसशी काही संबंध नाही.

डॉक्टरांनी सांगितले की, फ्रिजमध्ये ताज्या आणि शिजवलेल्या भाज्या वेगळ्या आणि स्वच्छ ठेवायला हव्यात. वाफ आणि फ्रीजमध्ये उघडझाप करताना वातावरणाचा दमटपणा बुरशी सदृश असतो, मात्र ते ब्लॅक फंगस नसते.

कांद्याने ब्लॅक फंगस होतो का?

न्यूट्रीशनिस्ट डॉ. शैली तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्यावर येणारा काळपटपणा सुद्धा एक फंगस आहे. ज्याचे नाव Aspergillus niger आहे.

हे मातीत आढळून येणारं एक (Black mould) आहे. ब्लॅक मोल्ड फ्रिजमध्ये रबर ट्यूबमध्ये दिसून येते. त्याला stachybotrys chartarum असे म्हणतात.

काळे, बुरशीने सडलेले पदार्थ, शिजवलेलं अन्न, ब्रेड आणि माव्यात हा पदार्थ दिसून येतो. परंतु तरीही कांदा वापरण्यापूर्वी चांगले धुणे आवश्यक आहे. तर त्याच वेळी जर आपल्याला फ्रीजमध्येही काळा थर दिसला तर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा सोल्यूशनने स्वच्छ करण्याची आवश्यकता असते.

कसा पसरतो ब्लॅक फंगस

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) नं दिलेल्या माहितीनुसार म्यूकोरमायकोसिस एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे. बाहेरच्या वातावरणात हा पदार्थ मोठया प्रमाणात वाढतो.

हा एक mycormycetes नावाचा फंगस आहे. मुख्यत्वे मातीत हा फंगस दिसून येतो. हवेच्या माध्यमातून जेव्हा फंगल पोर्स आत घेतले जातात तेव्हा सायनस आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो.

डोळ्यांच्या आजूबाजूला वेदना आणि लालसरपणा येतो. खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, रक्ताच्या उलट्या, मानसिक स्थिती बदलणं, ताप येणे अशा समस्या दिसून येतात.

फ्रिज किंवा कांद्याशी ब्लॅक फंगसचा काही संबंध नाही, हे तज्ञांनी सिद्ध केले आहे. काळ्या बुरशीच्या प्रसाराची कारणे भिन्न आहेत. परंतु लक्षात ठेवा, फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खा आणि घरातील स्वच्छतेची काळजी घ्या.

कारणं काय आहेत?

  • अनियंत्रित मधुमेह
  • शरीरावर ओलसरपणा असणे
  • रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असणे
  • स्टेयरॉईडनं इम्यूनोसप्रेसन होणे
  • दीर्घकाळ आयसीयूमध्ये राहणे
  • ब्लड कल्चर टेस्ट, कफची फंगल कल्चर टेस्ट, त्वचेवरील KOH फंगस असणे या मार्गांनी या बुरशीची चाचणी केली जाते.

पांढऱ्या बुरशीच्या बाबतीत, रुग्णाला अँटी-फंगस औषधांचे डोस दिले जातात. हा डोस वेळेवर रुग्णांना देणे फार महत्वाचे आहे. जर अ‍ॅन्टीफंगल डोस वेळेत न दिला तर ते देखील प्राणघातक ठरू शकते.

शरीरात पांढर्‍या बुरशीचे प्रमाण वाढण्यामुळे फूड पाईपवर परिणाम होतो. जेव्हा आपल्या रक्तामध्ये त्याचा परिणाम होतो, तेव्हा त्याचा मेंदू आणि मूत्रपिंडावरही परिणाम होतो. इतकेच नाही तर फुफ्फुसांमध्येही संसर्ग होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here