मुंबई : प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जर तुम्ही जनधन खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वातंत्र्यदिनी देशाला केलेल्या संबोधनात जनधन योजनेची घोषणा केली होती. त्याच वर्षी 28 ऑगस्ट रोजी या योजनेची सुरुवात झाली होती.
31 मार्च 2021 पर्यंत सर्व ग्राहकांचे आधार लिंक करण्याच्या सूचना सरकारने बँकांना दिल्या आहेत.
त्यामुळे जर तुमचं जनधन अकाऊंट असेल तर तुम्ही तुमचा आधार नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक करुन घ्या. नाहीतर 2 लाख 30 हजार रुपयांचा फायदा तुम्ही मिळवू शकणार नाहीत.
41 कोटी लोक प्रधानमंत्री जनधन योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत जनधन खात्यांची एकूण संख्या 41 कोटी 75 लाख आहे.
जनधन योजनेत 2.30 लाखाचा विमा
>> जनधन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे कार्ड उपलब्ध करुन दिलं जातं
>> या डेबिट कार्डवर 1 लाख रुपये अपघात विमा मोफत दिला जातो
>> तर 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यासाठी अपघात विमा वाढवून 2 लाख रुपये केला आहे
>> त्याचबरोबर या डेबिट कार्डवर 30 हजार रुपयांचं फ्री लाईफ इन्श्युरन्स कव्हरही मिळतं
>> हा विमा त्या जनधन खातेधारकांना मिळेल ज्यांनी 15 ऑगस्ट 2014 ते 31 जानेवारी 2015 दरम्यान खातं उघडलं आहे.
कोणत्या जनधन खात्यांशी आधार लिंक करावं लागेल
>> तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं आपलं खात्याशी आधार लिंक करु इच्छित असाल तर त्यासाठी इंटरनेच बँकिंग सुरु असायला हवं.
>> तुमचं नेट बँकिंग लॉग इन केल्यानंतर आधार क्रमांक लिंक करण्याचा पर्याय निवडा.
>> जर तुमच्याकडे नेटबँकिंग नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन आधार लिंक करु शकता.
>> तेव्हा बँकेत जाताना आधार कार्डची एक फोटो कॉपी आणि पासबुक घेऊन जावं लागेल.
>> अनेक बँक आता मॅसेजद्वारेही बँक खात्याशी आधार लिंक करुन घेत आहेत.
जनधत खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्र
>> जनधन खातं उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससह KYCची गरज पूर्ण करणारी कागदपत्र जमा करु शकता.
>> जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्ही स्मॉल अकाऊंट उघडू शकता.
>> त्यासाठी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ आणि बँक अधिकाऱ्यासमोर स्वाक्षरी करावी लागेल.
>> जनधन खाते उघडण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाहीत.
>> 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कुणीही व्यक्ती जनधन खाते उघडू शकतो.