कॅडबरी चॉकलेटमध्ये बीफ आहे का? जिलेटिन सापडल्याचा सोशल मीडियावर मोठा दावा, कंपनीकडून खुलासा : फॅक्ट चेक

572

कॅडबरी चॉकलेटमध्ये गोमांस असल्याचा दावा करत एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वेबसाइटवरून घेतलेला स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदारपणे शेअर केला जात आहे.

या पोस्टमध्ये असे नमूद करण्यात आले की, जर उत्पादनामध्ये जिलेटिन नावाचा घटक असेल तर याचा अर्थ असा की तो गोमांस वापरुन बनविला गेला आहे.

भारतात विकल्या जाणार्‍या कॅडबरी उत्पादनांमध्ये गोमांस आहे असा दावा करण्यासाठी बर्‍याच लोकांनी हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

कॅडबरी कंपनीचे म्हणणे आहे की, हे पूर्णपणे दिशाभूल करणारी माहिती आहे, कारण हे उत्पादन भारताचे नाही. कंपनीने म्हटले आहे की गोमांस किंवा इतर कोणतेही मांस भारतात विकल्या जाणार्‍या उत्पादनांमध्ये वापरले जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here