आता घाबरू नका, म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही : डॉ. तात्याराव लहाने

1374
Dr lahane

म्युकरमायोसिस हा संसर्गजन्य आजार नसल्याचे राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले आहे. यापूर्वीही म्युकरमायकोसिस हा आजार होता असेही डॉ. लहाने यांनी म्हटले आहे.

कोरोना संकटाबरोबरच राज्यात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

या आजारामुळे राज्यात ९० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

डॉ. लहाने यांनी सांगितले : म्युकर जमिनीतून आपल्या शरिरात जातो. तो हवेतून पसरतो असे म्हणता येणार नाही.

रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्यात साथीच्या आजारात याचा समावेश केला आहे. राज्यात म्युकरमायकोसिसच्या सध्या ८०० रुग्ण आहेत. ११० ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्य सरकारने म्युकरमायकोसिसवरील औषधांवर नियंत्रण ठेवले असून, राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या औषधांचे वितरण होत असल्याची माहितीही डॉ. लहाने यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here