मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Maharashtra Corona) झाला आहे. डबल म्युटेंट कोरोनानं (Double Mutant Corona) महाराष्ट्राची झोप उडवली आहे. डबल म्युटेंटमुळेच रुग्णवाढीचा उद्रेक होत असल्याचं आता समोर आलं आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, पंजाबमध्ये डबल म्युटेंटची पुष्ठी झाली आहे. महाराष्ट्र आणि देशातल्या रुग्णवाढीमागे कोरोनाच्या डबल म्युटेंट कारणीभूत असल्याचा दावा आता समोर आला. आता हा डबल म्युटेंट काय आहे, तो इतका वेगाने का पसरतोय, आणि त्याचा किती धोका आहे. ते समजून घेण्याची गरज आहे.
E484Q आणि L452R हे कोरोनाचे दोन वेगवेगळे स्ट्रेन आहेत.
- भारतातल्या काही राज्यांमध्ये मात्र हे दोन्ही स्ट्रेन एकत्रित रुपाने समोर आले आहेत.
- याआधी अशा प्रकारचा स्ट्रेन अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियात आढळला होता
- भारतात आतापर्यंत महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीत या डबल म्युटेशनचा फैलाव झाल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे.
- आता हे कोरोनाचं डबल म्युटेंट जास्त धोकादायक का आहे. ते सोप्या भाषेत समजून घ्या.
- कोरोना विषाणूत स्पाईक प्रोटिन नावाचा एक घटक असतो.
- स्पाईक प्रोटिनच्याच मदतीने कोरोना विषाणू माणसांच्या पेशींमध्ये चिटकून बसतो.
- ज्यानंतर फुफ्फुसांवर कोरोना विषाणू हल्ला चढवण्याचे काम करतात
- गेल्यावर्षीच्या शेवटच्या काही महिन्यात कोरोना स्ट्रेनमध्ये जे स्पाईक प्रोटिन होते, त्याची क्षमता कमी झाली होती.
- म्हणजेच कोरोनाचा विषाणू कमी प्रमाणात शरिराला बाधित करत होता.
- मात्र आत्ताच्या डबल म्युटेशनमुळे दोन प्रकारचे स्पाईक प्रोटीन एकाच स्ट्रेनमध्ये एकत्र आले आहेत
- ज्याचा अर्थ कोरोनाचा प्रसार आणि त्याच्या भीषणतेत दुप्पटीने वाढ झाली आहे.
अँटीबॉडिजनाही जुमानत नाही
हा विषाणू कोरोनाच्या अँटीबॉडिजनाही जुमानत नसल्याचेही दावे होत आहेत. ज्यामुळे मागच्या दीड महिन्यात 2 वेळा कोरोना झाल्याची उदाहरणे वाढली आहेत.
तूर्तास कोरोनाचा हा स्ट्रेन कधीपर्यंत निष्प्रभ होईल, याचे उत्तर शास्त्रज्ञांकडे नाही. मात्र लसीकरण झाले असेल, तर आणि तरच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला तुम्ही काही प्रमाणात थोपवू शकता.
कोरोनाची नवी लक्षणे
कोरोनाच्या आधीच्या संसर्गापेक्षा आताची लक्षणे ही दिसू लागली आहेत. यापूर्वी असिम्पटोमॅटिक म्हणजेच लक्षणविरहीत कोरोना रुग्ण आढळत होते.
कोरोनाच्या लक्षणामध्ये घशात खवखव आणि घशात टोचल्यासारखं जाणवत आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांपैकी 52 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळत आहेत. खाताना किंवा पाणी पितानाही काही रुग्णांना घशात जळजळ जाणवते.