लातूर : इंडो नेपाल दलित मैत्री संघ आणि बाबू जगजीवनराम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्यावतीने देश विदेशातील सामाजिक, साहित्यिक, संस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तीच्या अद्वितीय सामाजिक राजकीय योगदान देणाऱ्या मान्यवर समाजसेवक मध्ये लातूरचे माजी खासदार डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना सन २०२१ चा डॉ. बी. आर.आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड दि.८ मे रोजी नेपाल लुंबिणी येथे भव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.
या पुरस्काराची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ नफेसिंह खोबा यांनी पुरस्कार निवडीचे पत्र आज दि १५ एप्रिल रोजी देण्यात आले.
भारत नेपाळ दलित मैत्री संघ आणि बाबू जगजीवनराम कला संस्कृती साहित्य अकादमी च्या संयुक्त विद्यमाने नेपाळ लुंबिनी येथे ८ मे २०२१ रोजी संप्पन होणाऱ्या अंतरराष्ट्रीय परिषदेत प्रोफेसर डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना डॉ.बी.आर.आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड २०२१ नी सन्मानित करण्यात येणार आहे.
त्या संदर्भात डॉ. गायकवाड म्हणाले, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जन्मभूमीत नेपाळ लुंबिणी येथे हा जागतिक पुरस्कार मला मिळत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.
मला अनेक पुरस्कार मिळाले पण बुध्द जन्मभुमित मिळालेला हा पुरस्कार आणखी सामाजिक धार्मिक राजकीय काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.
हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचे देश विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.