मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, ही संघाची भूमिका होती | देवेंद्र फडणवीस

215

नाशिक : मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले पाहिजे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

ते नाशिक येथील कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर फडणवीस यांनी टीका केली आहे.

मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांनी कारावास भोगला असल्याचेही फडणवीस म्हणाले.

मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावं ही संघाची भूमिका होती. आरएसएस विषयी अपप्रचार केला जात होता. संघाची भूमिका नानांनी मांडली.

इंदिरा गांधी सरकार असताना अनेकांना तुरंगात टाकले. पण संघ विचाराने प्रेरित झालेलं कार्यकर्ते खचले नाहीत. संघाचे कार्य व्यक्ती निर्माणाचे कार्य नाना नवले यांनी केले.

माणूस ओळखण्याचा हातोटा नानांमध्ये आहे. आपल्या संपूर्ण जीवनात इतरांना देण्याचं काम नाना नवले यांनी केलं, असल्याचंही फडणवीस यांनी सांगितले.

सरकारची भूमिका दुटप्पी : फडणवीस

औरंगाबाद नामांतर प्रश्नी सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ट्विटर वर संभाजीनगर उल्लेख करायचा आणि जे अधिकारात आहे ते नामांतर करायचे नाही.

सत्ता असली कि पक्षात इंक्मिग होते, सत्ता गेली कि असे लोक पक्ष सोडून जातात, जे पक्ष सोडून गेले त्यांच्याविषयी काही फरक पडणार नाही. सत्ता हि चंचल असते, असे फडणवीसा यांनी म्हटले.

   मुख्यमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here