डॉ. शीतल आमटे आत्महत्येचा गुंता कायम | मुंबई पोलिसांसमोर टॅबचा Eye पासवर्ड शोधण्याचे ‘आव्हान’

221
Dr Sheetal Amte

चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येला चार महिने होऊन गेले तरी तपासात काहीही प्रगती झाली नसल्याचे निराशाजनक चित्र आहे. 

अद्याप पर्यंत डॉ. शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना पूर्णपणे अपयश आले आहे. हा पासवर्ड शोधण्यात अपयश असल्याने ती जबाबदारी आता Central Forensic Science Laboratory कडे सोपवण्यात आली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली.

डॉ.शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आले आहे. शीतल आमटे यांच्या टॅबला Eye पासवर्ड आहे.

त्यामुळे तो शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यामुळे आता ही जबाबदारी आता पुण्यातील central forensic science laboratory कडे सोपविली आहे.

फॉरेन्सिक लॅबकडे जबाबदारी

डॉ. शीतल आमटे यांचे 2 मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब हे सर्व Central forensic science laboratory कडे देण्यात आले. डॉ. शीतल यांच्या लॅपटॉप आणि 2 मोबाईलचा पूर्ण डेटा अद्याप रिकव्हर झाला नसल्याचे शंका चंद्रपूर पोलिसांनी वर्तवली आहे. या इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या मदतीनेच डॉ. शीतल यांच्या आत्महत्येमागील कारण कळणार आहे.

गॅझेट्सना आय पासवर्ड 

डॉ. शीतल आमटे यांचा लॅपटॉप, मोबाईल, टॅब तसेच इतर गॅझेट्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या या गॅझेट्सचे पासवर्ड त्यांनी नुकतेच बदलल्याची माहिती आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे पती गौतम करजगी बदललेल्या पासवर्डबद्दल यांना देखील कल्पना नाही. यातील काही गॅझेट्सना सॉफ्टवेअर लॉक आहे, तर काही गॅझेट्सना त्यांनी स्वत:च्या डोळ्यांचे पासवर्ड ठेवले होते.

त्यामुळे ताब्यात घेतलेला टॅब, लॅपटॉप, आणि मोबाईल मधील माहित संकलित करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. त्यामुळे परिणामी तपासावर परिणाम होत आहे. त्यांच्या मृत्यूमागे नेमके कारण काय होते याचा शोध घेण्यात मुख्य अडचण Eye Password ठरत आहे.

पोलिसांनी सर्व गॅझेट्स मधील माहिती जमा करण्यासाठी ती नागपूरच्या फोरेन्सिक पथकाने मुंबईतील आयटी (IT) तज्ज्ञांकडे पाठवले होते.

या गॅझेट्सच्या साहाय्याने डॉ. शीतल यांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यास मदत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

आत्महत्येसाठी वापरले विष  

शीतल आमटे यांनी आत्महत्येसाठी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली आहेत. शीतल यांनी आत्महत्येसाठी नेमके कोणते विषारी रसायन वापरले याचा तपास पोलीस करीत आहेत.

याबाबतचा फोरेन्सिक अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, डॉ. शीतल यांनी आत्महत्यासाठी वापरलेले विष हे अत्यंत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांनी हे विष त्यांनी कोठून मिळवले याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली होती.

त्यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आपले आयुष्य संपविले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here