मुंबई : शहरातील सर्वात मोठ्या ड्रग्ज सप्लायरच्या मुलाला अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली. त्याच्याकडून २ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे.
मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारूख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला गुरुवारी रात्री मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने अटक केली.
दरम्यान, गुरुवारी सकाळी मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने डोंगरी आणि नागपाडा परिसरात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी चिंकू पठाणच्या ठिकाणांवर छापेमारी केली.
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, पठाण हा हिस्ट्री- शीटर असून, चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांना तो ड्रग्ज पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोपी आहे.
त्याच्याकडून २ कोटी रुपये किंमतीचे ड्र्ग्ज जप्त करण्यात आले आहेत. ‘लोखंडवाला, वर्सोवा आणि मिरा रोड परिसरात रात्री छापे मारले.
यात दोन कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज आणि आलीशान कार जप्त करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती एनसीबीने दिली.या छापेमारीत पथकाने नोटा मोजण्याची मशीनही जप्त केली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
शादाब बटाटा हा बऱ्याच काळापासून ड्रग्जचा उद्योग करत आहे. मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्जचा पुरवठा करण्याचे काम तो करत असल्याची माहिती मिळाली आहे.